राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी हांडे

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील युवा नेते विनोद हांडे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी मुंबई येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात हांडे यांना देण्यात आले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली 2019 साली अकोले तालुक्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तनाच्या ऐतिहासिक प्रक्रियेत आमदार डॉ. किरण लहामटे यांना निवडून आणण्यात विनोद हांडे यांनी मोलाची भूमिका निभावली होती. तालुक्यातील प्रत्येक गावात सभा घेऊन आक्रमक प्रचार केला. तसेच युवक क्रांती संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात युवांचे मोठे संघटन उभे केले असून अनेक समाजोपयोगी उपक्रम ते घेतात. यापूर्वी ते यूथ फेडरेशन, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहिलेले आहेत. आता राज्य स्तरावर काम करण्यासाठी मिळालेल्या संधीमुळे तालुक्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीचे तालुक्यातील सर्वच स्तरांतून स्वागत होत असून जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर, युवा नेते अमित भांगरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, महिला अध्यक्षा स्वाती शेणकर, सचिव विकास बंगाळ, युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी, अशोक राक्षे, लक्ष्मण शेळके, सुहास वाळुंज, गणेश कोकणे, रामनाथ शिंदे, रामहरी चौधरी, भाऊ चौधरी, कृष्णा हासे, सुरेश मुंढे, सुभाष हासे, विलास हासे, दत्ता धुमाळ, दीपक देशमुख, प्रकाश देशमुख, राजेंद्र कुमकर आदिंनी अभिनंदन केले आहे.

Visits: 116 Today: 2 Total: 1099990

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *