अकोलेतील चंदुकाका सराफच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद विविध आकर्षक ऑफर्स असल्याने ग्राहकांची होतेय गर्दी

नायक वृत्तसेवा, अकोले
सोने, चांदी व व हिर्‍यांच्या लक्षवेधी दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री अकोले येथे चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने 18 ते 21 नोव्हेंबर, 2021 गजानन एजन्सीजमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला अकोलेकरांचा पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गेली 195 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत प्रत्येक ग्राहकांच्या मनात विश्व निर्माण करणारे नाव म्हणजे चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् म्हणजे बारामतीचे शुध्द सोने ही संकल्पना घराघरात पोहोचवली. यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यभार संपादित केलेल्या चंदुकाका सराफ यांनी दागिन्यांचं आपलं दुकान ही संकल्पना घेऊन अहमदनगर व संगमनेर परिसरातील ग्राहकांच्या सोयीकरीता उत्तमोत्तम आणि कलात्मक दागिन्यांचे प्रदर्शन अकोलेकरांकरिता खास आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ सारडा कॉम्प्लेक्सचे संचालक विजय सारडा, ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव, माजी प्राचार्य आबासाहेब देशमुख, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, आशिष सारडा, संतोष देशमुख, पंचायत समिती सदस्य आढाव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच या प्रदर्शनाची पाहणी माजी अदिवासी मंत्री मधुकर पिचड, अ‍ॅड.वसंत मनकर आदिंनी केली.

अकोलेमध्ये प्रथमच अशा पद्धतीचे हिरेजडीत दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये पारंपारिक व लेटेस्ट डिझाईन्सचे असंख्य सोन्याचे व हिर्‍यांचे दागिने तसेच फॉर्मिंग दागिने ग्राहकांना पाहायला व खरेदी करायला मिळणार आहेत. यात हिर्‍याचा व सोन्याचा नेकलेस फक्त 9 हजार 999 भरून खरेदी करता येणार आहे. उर्वरित रक्कम ईएमआयद्वारे (मासिक हप्ता) भरण्याची सोय उपलब्ध आहे. याचबरोबर सोने खरेदीवर ‘चांदी फ्री’ अशीही ऑफर उपल्ब्ध आहे. शिवाय हिर्‍यांच्या दागिने मजुरीवर 100 टक्के पर्यंत सूट देण्यात आली आहे. याचबरोबर फॉर्मिंग दागिने व गिफ्ट आर्टिकलच्या 3500 रुपयांपर्यंच्या खरेदीवर 5 टक्के व त्यापुढील खरेदीवर 10 टक्के सूट देण्यात आली आहे. याचबरोबर सिल्व्हर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीच्या दोन किंवा अधिक दागिन्यांच्या खरेदीवर फ्लॅट 10 टक्के सूट देण्यात आली आहे. याचबरोबर कल्पतरू किंवा गोल्ड ट्री प्लस योजनेत 3 हजार रुपये किंवा अधिक गुंतवणूक करुन एक चांदीचे एक नाणे भेट मिळण्याची संधी आहे. अशा असंख्य ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा फायदा उठवावा, असे आवाहन चंदुकाका सराफ अँड सन्सतर्फे करण्यात आले आहे.

Visits: 96 Today: 2 Total: 1105224

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *