अखेर संगमनेर तालुक्याने ओलांडले अडिचावे सहस्रक..! आजही तालुक्यात पडली 49 रुग्णांची नव्याने भर

नायक वृत्तसेवा, संगमनेर

तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोविडचे संक्रमण सुरू असून दररोज त्यात मोठ्या रुग्ण संख्येची भर पडत आहे. मंगळवारी 82 रुग्णांची वाढ झाल्याने तालुक्याने कालच बाधितांचे 24 वे शतक ओलांडले होते. अवघ्या 24 तासांतच त्यात पुन्हा 49 रुग्णांची भर पडून तालुक्यातील बाधितांची संख्या 2 हजार 516 वर पोहोचली आहे. आजही शहराच्या रूग्ण संख्येत केवळ 9 तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत तब्बल 40 रुग्णांची भर पडली आहे.

आज शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील नऊ जणांसह एकूण एकोणपन्नास जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील मेनरोड येथील 75 वर्षीय महिला, मोमिनपुरा परिसरातील 40 वर्षीय तरुण, इंदिरानगर मधील 18 वर्षीय तरुण, अभंगमळा भागातील 38 वर्षीय तरुण, विद्यानगर मधील 55 वर्षीय महिलेसह 50 वर्षीय इसम, मालदाड रोड परिसरातील 46 व 26 वर्षीय तरुण, तसेच जानकीनगर परिसरातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव आला आहे.

त्यासोबतच तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही 40 रुग्णांची भर पडली. त्यात घुलेवाडीतील 71 व 59 वर्षीय इसम, 41 व 34  वर्षीय तरुण, 26 वर्षीय महिला तसेच तेरा वर्षीय बालिका, मनोली येथील 58, 55 व 52 वर्षीय इसम, घारगाव येथील 67 वर्षीय इसम, पिंपळे येथील 55 वर्षीय इसम, वडगाव पान येथील 32 वर्षीय महिला व 53 वर्षीय इसम, निमगाव टेंभी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव जाळी येथील 56 व 55 वर्षीय इसम, हिवरगाव पठार येथील 53 वर्षीय इसम, कासारा दुमाला येथील 42 वर्षीय तरुण, वनकुटे येथील 48 वर्षीय इसमासह 42 वर्षीय महिला,

मिर्झापूर येथील 10 वर्षीय बालक, पेमगिरी येथील 33 वर्षीय महिलेसह सहा वर्षीय बालिका, देवकौठे येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 34 वर्षीय महिला व अकरा वर्षीय बालक, आश्वी बुद्रुक मधील 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेसह 42 व 18 वर्षीय महिला, ओझर खुर्द मधील 75 वर्षीय महिलेसह 55 वर्षीय इसम, जोर्वे येथील 35 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 20 वर्षीय तरुणासह 10 वर्षीय बालक, समनापुर येथील 55 वर्षीय इसम, साकुर मधील 65 वर्षीय महिला, मालुंजे येथील 55 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, निमोण मधील 52 वर्षीय इसम व आंबी दुमाला येथील 50 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही 49 बाधितांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे अडिचावे सहस्रक ओलांडून 2 हजार 516 रुग्णसंख्या गाठली आहे.

जिल्ह्यातील ८४० रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज..

अहमदनगर महापालिका क्षेत्र २५०, संगमनेर ६२, राहाता ६९, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ५६, श्रीरामपूर ७८, लष्करी परिसर १४, नेवासा ४०, श्रीगोंदा ३७, पारनेर २५, अकोले २७, राहुरी ४२, शेवगाव ४६, कोपरगाव २१, जामखेड ३२, कर्जत २८, लष्करी रुग्णालय ०८ अशा एकूण ८४० रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला. 

  • जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या : २८ हजार ५१२..
  • जिल्ह्यात उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : ४ हजार ७६८..
  • जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ५३३..
  • जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : ३३ हजार ८१३..
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३२ टक्के..
  • जिल्ह्यात पडली आज ९०६ बाधितांची भर..

Visits: 23 Today: 1 Total: 118191

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *