लोहारे येथील जाधव कुटुंबियांना मदतीचा हात

लोहारे येथील जाधव कुटुंबियांना मदतीचा हात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील लोहारे येथील महिला लघू उद्योजक शोभा जाधव यांचे दुकान वीज शॉर्टसर्किटने पूर्ण जळीत झाले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाला हातभार लावून त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन पुन्हा पूर्ववत होण्यासाठी संगमनेर तालुका नाभिक महासंघ व सलून असोसिएशन तर्फे शिलाई मशीन नुकतीच भेट देण्यात आली.


याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, अहमदनगर जिल्हा नाभिक महासंघाचे सरचिटणीस मनोज वाघ, शिर्डी-राहाता तालुका नाभिक महासंघाचे अध्यक्ष अशोक कोरडे, संगमनेर तालुका नाभिक महासंघाचे अध्यक्ष किशोर बिडवे, सलून असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण वाघ, उपाध्यक्ष संजय जाधव, किरण मदने, गणेश बिडवे उपस्थित होते. नाभिक समाज बांधवांनी केलेली मदत ही माझ्या अंधःकार प्रपंचाला प्रकाशाचा किरण दाखविणारी असल्याची प्रतिक्रिया भावनिक होऊन शोभा जाधव यांनी दिली. सभापती जोर्वेकर यांनी ग्रामविकास अधिकारी व तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्याची पाहणी केली आणि जास्तीत जास्त मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मदत कार्य यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष किरण बिडवे, किरण बिडवे, सूर्यकांत बिडवे, प्राध्यापक प्रदीप कदम, मंगेश सस्कर, सोमनाथ परदेशी, राजेंद्र कोल्हाळ, सागर बोराडे, गणेश बिडवे, सचिन सस्कर, गणेश तुकाराम बिडवे, रवींद्र भराडे, माथाजी चौधरी आदिंनी मदत केली. आपत्तीग्रस्त कुटुंबप्रमुख माधव जाधव यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

Visits: 12 Today: 1 Total: 79919

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *