‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ सोनी मराठी वाहिनीवर


नायक वृत्तसेवा, नगर
जिने खोदली औरंगजेबाची कबर अशा रणरागिणीची, ताराराणीची गाथा ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तारारणींनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली आणि स्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. एक वाघ तर दुसरा सिंह. चारही दिशांना विखुरलेले अवघे मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळेत एकवटले आणि मराठी साम्राज्यात देदीप्यमान इतिहास घडला. संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, मोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागले. तुम्हांला पाण्यात काय संताजीधनाजी दिसतात का. असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत. स्वराज्य सौदामिनी ताराराणी हे स्वराज्याच्या इतिहासातील देदीप्यमान पर्व 15 नोव्हेंबरपासून, सोमवार-शनिवार संध्या 7:30 वाजता सोनी मराठीवर सुरू होणार आहे.

Visits: 109 Today: 1 Total: 1101267

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *