थोरात कारखान्याच्या कामगारांना बारा टक्के वेतनवाढ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील संपूर्ण साखर कारखान्यांसाठी आदर्शवत ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना बारा टक्के वेतनवाढ लागू करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या लक्ष्मीपूजन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधव कानवडे, इंद्रजीत थोरात, डॉ.जयश्री थोरात, डॉ.हसमुख जैन, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्चांकी गाळप करून उच्चांकी भाव दिला आहे. कार्यक्षेत्रातील सभासद ऊस उत्पादक यांचे हित जोपासताना कार्य क्षेत्राबाहेरील सभासदांचा कायम विश्वास सार्थ ठरवला आहे. या चालू हंगामात कारखान्याचे 13 लाख 19 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून कारखाने तालुक्याच्या विकासाचे हृदय भरून काम केले आहे. कारखान्याने आर्थिक शिस्त, पारदर्शकता व काटकसर ही त्रिसूत्री जपत उच्चांकी भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. याबरोबर कामगारांचे हितही जोपासले आहे. राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढीचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी करत 12 टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर दिवाळीला 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान सुद्धा कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून या कारखान्याने कायम काम केले आहे. कारखान्याच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे अमृत कामगार यूनियन संघटनेच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक संपत गोडगे, मीनानाथ वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कामगार संचालक केशव दिघे, राजेंद्र कढणे, यूनियनचे अध्यक्ष किशोर देशमुख, बाळासाहेब फापाळे आदी उपस्थित होते.

Visits: 17 Today: 3 Total: 116552

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *