गरीब कुटुंबांना सरकारने दिवाळीपूर्वीच अत्यावश्यक वस्तू पुरवाव्यात! अकोले ग्राहक पंचायत समितीची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्य सरकारने कोविडमुळे त्रस्त झालेल्या कुटुंबांना स्वस्त अन्नधान्य दुकानातून मुलभूत व अत्यावश्यक वस्तू दिवाळीपूर्वीच पुरवाव्यात, यामुळे त्यांची दिवाळी गोड होईल. यावर सकारात्मक चर्चा करुन निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन अकोले ग्राहक पंचायतने सोमवारी (ता.25) तहसीलदार सतीष थेटे दिले असून, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना पाठविल्या आहेत.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे पारंपारिक दिवाळी सारखे सण – उत्सव साजरे करता आले नाही. अनेकांच्या घरातील कर्त्या पुरुषांचेच निधन झाल्याने अनेक कुटुंबे पोरकी व अनाथ झाली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही नातेगोते दुरावले गेले आहेत. दवाखान्याच्या बिलासाठी गरीब कुटुंबांना आर्थिक संघर्ष करावा लागत आहे. सद्यस्थितीत 70 ते 80 टक्के कुटुंबे कर्जाच्या खाईत डुबलेली आहेत. अशा कुटुंबांना सेवासुविधा, शैक्षणिक खर्च, आरोग्य खर्च करून कुटुंबे चालविणे मोठे जिकीरीचे झाले आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांसह कामगार, मजूर यांचेही हाल झाले आहेत. त्यातच महामाईचा रोज भडका उडत आहे. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करणे कठीण आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गरीब घटकांना स्वस्त अन्नधान्य दुकानातून मुलभूत व अत्यावश्यक वस्तू गहू, तांदूळ, तेल, तुरडाळ, हरबराडाळ, रवा, मैदा, साखर आदी वस्तू दिवाळीपूर्वी पुरवाव्यात. यामुळे गरीबांची दिवाळी गोड होईल, अशी भावना अकोले ग्राहक पंचायत समितीने निवेदनातून व्यक्त केली आहे. यावर सरकार काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. सदर निवेदनावर ग्राहक पंचायतचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, दत्ता शेणकर, दत्तात्रय रत्नपारखी, प्रा. डॉ. सुनील शिंदे, अ‍ॅड. राम भांगरे, दीपक शेटे, राजेंद्र लहामगे, भाऊसाहेब वाळुंज, महेश नवले, रामहरी तिकांडे, माधव तिटमे, भाऊसाहेब गोर्डे, शुभम खर्डे, प्रतिभा सूर्यवंशी, दत्ता ताजणे, शोभा दातखिळे, शारदा शिंगाडे, किरण चौधरी, राजेंद्र घायवट, जालिंदर बोडके, रामदास पांडे, ज्ञानेश पुंडे, मच्छिंद्र चौधरी, सुरेश पवार, गणेश पोखरकर, सुदाम मंडलिक, प्रमोद मंडलिक, शब्बीर शेख, सुनील देशमुख, गंगाराम धिंदळे आदिंच्या सह्या आहेत.

Visits: 81 Today: 1 Total: 1110383

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *