तालुक्याच्या विकासासाठी राजकारण सोडून एकत्र यावे ः भांगरे यशवंत यूथ फाऊंडेशन आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्याकडे पाहिले तर तालुका अनेक वर्ष मागे आहे. यासाठी आपण सर्वांनी राजकारण सोडून एकत्र आले पाहिजे. जर एकत्र आलो तरच पुढच्या पिढ्या सुखी राहतील असा विश्वास यशवंत यूथ फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा युवा नेते अमित भांगरे यांनी व्यक्त केला.
यशवंत यूथ फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा महाराजा लॉन्स येथे गुरुवारी (ता.21) थाटामाटात पार पडला. यावेळी अकोले तालुक्यातील विविध गावांतून सामाजिक, राजकीय, महिला बचत गट, युवक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्यने उपस्थित होते. तसेच शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्या हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सांवत यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी सूचना अशोक गायकवाड यांनी मांडली. त्यास अनुमोदन रामहरी चौधरी यांनी दिले. यानंतर आदर्श माजी स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व माजी स्वर्गीय आमदार यशवंत भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारगिल युद्धात आपल्या अंगावर बॉम्ब झेलून दोन्ही पाय गमावलेले दीपचंद यांची विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी आदिवासी भगीनींनी नृृृृत्य सादर केले. स्वर्गीय माजी आमदार यशवंत भांगरे यांच्या कार्याची माहिती प्रशांत धुमाळ यांनी दिली. शाहीर मुकुंद भोर यांनी शिवचरित्राचा दाखला देत उपस्थितांचे मन वेधून घेतले. पुढे बोलताना अमित भांगरे म्हणाले, आपल्या मुलांना मार्गदर्शन मिळत नाही यासाठी आपल्याकडे व्हिजन असल्याचे अधोरेखित करत यासाठी मोबाईल नेटवर्क, विकासकामे, पर्यटन यासाठी आपण यशवंत यूथ फाऊंडेशनच्या माध्यमातून एकत्र येऊन व्हिजन तयार करण्याचे सूचित केले. तसेच निसर्गरम्य तालुका असताना आपण मागे का यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. लोकांचे आयुष्य व स्वप्न चांगले करण्यासाठी तालुक्यात लोकांचा एकमेकांशी संवाद करावा लागेल. अनेक योजनांची लोकांना माहिती होत नसल्याने, योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने तशाच पडून राहत असल्याचाही उल्लेख केला.
या कार्यक्रमास आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, माजी पोलीस अधिकारी मधुकर तळपाडे, जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, माजी उपसभापती मारुती मेंगाळ, महिला बचतगटाच्या मार्गदर्शिका स्वाती शाह, सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे, अगस्ति कारखान्याचे संचालक कचरु शेटे, प्रकाश मालुंजकर, गुलाबराब शेवाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, उपाध्यक्ष आर.के.उगले, सुरेश खांडगे, प्रदेश सरचिटणीस विनोद हांडे, बाळासाहेब आवारी, उज्ज्वला राऊत, तनुजा घोलप, अमित नाईकवाडी, योगेश नाईकवाडी, निखील जगताप, स्वाती शेणकर, विवेक चौधरी, नीता आवारी, संपत नाईकवाडी, राजाराम वाकचौरे, विकास वाकचौरे, शिवाजी देशमुख, महेश तिकांडे, दिलीप भांगरे, सुरेश गडाख, सूर्यभान नाईकवाडी, बाळासाहेब ताजणे, संतोष परते, पोपट चौधरी, अभिजीत वाकचौरे, अशोक देशमुख, बी.जे.देशमुख, पर्बत नाईकवाडी, विकास बंगाळ, राज वाकचौरे, संजय वाकचौरे, सागर तिकांडे, रामनाथ शिंदे, संतोष तिकांडे, साहेबराव दातखिळे, मच्छिंद्र धुमाळ, रामहरी तिकांडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश कोकणे, सुहास वाळुंज यांनी केले तर दशरथ सावंत यांनी आभार मानले.