कोपरगाव-अहमदनगर राज्यमार्गाची तात्काळ दुरुस्ती करा ः ढाकणे

कोपरगाव-अहमदनगर राज्यमार्गाची तात्काळ दुरुस्ती करा ः ढाकणे
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव-अहमदनगर या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक 10ची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. याकडे शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष घालून दुरुस्ती करावी, अशी मागणी कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.


सध्या कोरोनाच्या संकटात कोपरगाव प्रशासनाकडून सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमधील सर्व आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता चांगल्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करत आहेत. परंतु काही रुग्णांची हालत नाजूक झाल्यावर त्यांना पुढील उपचारार्थ अहमदनगरला हलवावे लागते. मात्र, कोपरगाव-अहमदनगर या राज्यमार्गाची परिस्थिती बघता त्यांना लवकर उपचार मिळणे अवघड होत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णवाहिका चालकांना रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचविणे कठीण होत आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश मृत्यूंना कारणीभूत हा राज्यमार्ग ठरला आहे. त्यामुळे या जीवघेण्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी ढाकणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, तहसीलदार योगेश चंद्रे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

Visits: 133 Today: 1 Total: 1585109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *