राहाता शहरातील वीरभद्र मंदिरात जबरी चोरी
राहाता शहरातील वीरभद्र मंदिरात जबरी चोरी
नायक वृत्तसेवा, राहाता
राहाता शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र महाराजांच्या मंदिरात आज (मंगळवार ता.15) पहाटे अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राहाता शहरासह संपूर्ण पंचक्रोषचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरभद्र महाराजांच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली आहे. यामध्ये चोरट्यांनी श्री वीरभद्र महाराजांचे मौल्यवान दागिने, चांदीचा टोप, चांदीचे कासव तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरुन पोबारा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी घटना स्थळी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भोये हे करत आहे.