चंदुकाका सराफ अँड सन्सची ‘डिझाईनवाली दिवाळी’ची ऑफर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
195 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेले चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडने यंदा ‘डिझाईनवाली दिवाळी’ म्हणून आकर्षक योजना आणली आहे. आधुनिक कारागिरी आणि पारंपारिक मूल्यांचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या दागिन्यांची अप्रतिम श्रेणी उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 7 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर, 2021 पर्यंत सुरू असलेल्या ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उठवावा, असे आवाहन चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. संगमनेर शाखेने केले आहे.

दिवाळी हा केवळ एक सण नसून खरेदी, चवदार खाद्य पदार्थ, संस्कृती-परंपरा याची जपणूक व नात्यांमधील गोडवा अधिक वाढवण्याची पर्वणीच असते. नेमक्या याच भावनांचा एकत्रित संगम साधत चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. यांनी ‘डिझाईनवाली दिवाळी’ हा दागिन्यांचा अप्रतिम संग्रह सादर केला आहे. हा सुवर्ण संग्रह लालित्य, गुंतागुंत आणि सर्जनशीलतेभोवती आधारित आहे. आत्तापर्यंतच्या दागिन्यांच्या श्रेणी बाहेर पाऊल टाकत चंदुकाका सराफ अँड सन्स यांनी हिर्‍यांच्या दागिन्यांचे अप्रतिम कलेक्शन सादर केले आहे. या अंतर्गत हिर्‍याचा नेकलेस फक्त 9 हजार 999 भरून घरी घेवून जावू शकता व उर्वारित रक्कम इएमआयद्वारे (हफ्त्या) भरू शकता. याचबरोबर सोने खरेदीवर ‘चांदी फ्री’ अशीही ऑफर उपल्ब्ध आहे. शिवाय हिर्‍यांच्या दागिने मजुरीवर 100 टक्केपर्यंत सूट देण्यात आली आहे. तसेच विनाघट जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन दागिने अशीही ऑफर आहे. तेव्हा आजच संगमनेर बसस्थानकात असणार्‍या चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दालनाला भेट द्या व अप्रतिम दागिन्यांची खरेदी करून डिझाईनवाली दिवाळी समृध्दतेने व आधिक सौंदर्याने साजरी करा असे आवाहन चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.चे अध्यक्ष किशोरकुमार शहा यांनी केले आहे.

Visits: 48 Today: 1 Total: 436941

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *