बोरबनमध्ये पावसाने घराची भिंत कोसळली


नायक वृत्तसेवा, घारगाव
तालुक्याच्या पठारभागातील बोरबन येथील सोमनाथ बाबुराव गाडेकर या शेतकर्‍याच्या घराची भिंत कोसळल्याची घटना बुधवारी (ता.6) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. केवळ दैवबलवत्तर असल्याने गाडेकर कुटुंब हे बालंबाल बचावले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बोरबन गावांतर्गत असलेल्या सराटी येथे सोमनाथ गाडेकर हे कुटुंब भेंड्याच्या घरात वास्तव्यास आहे. त्यातच रात्रभर सुरू असलेल्या भीज पावसामुळे पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक घराची भिंत कोसळली. त्यावेळी गाडेकर यांची पत्नी व मुले घाबरून घराच्या बाहेर पळाले. केवळ दैवबलवत्तर असल्याने गाडेकर कुटुंब हे बालंबाल बचावले. घराची भिंत कोसळल्याची माहिती समजताच बोरबनचे सरपंच संदेश गाडेकर यांनी घटनेची माहिती कामगार तलाठी दादा शेख यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला आहे. जर कधी रात्रीची भिंत कोसळली असती तर मोठी घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया सोमनाथ गाडेकर यांनी दिली आहे.

Visits: 104 Today: 3 Total: 1103734

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *