दिलासा ठरला क्षणिक! संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ!! तालुक्यातील बाधित गावांची संख्याही शंभराहून अधिक; आणखी तीन गावे झाली ‘लॉकडाऊन’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून तालुक्यात निर्माण झालेले दिलासादायक चित्र पुन्हा एकदा अदृष्य झाले असून मागील चार दिवसांचा दिलासा तात्पुरता ठरला आहे. एकीकडे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आलेली असतांना संगमनेर तालुका मात्र त्याला अपवाद ठरला असून तालुक्यात गेल्या दोन दिवसांत दोनशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातील संक्रमणातही वाढ झाली असून 174 पैकी अवघ्या 55 गावांमधील रुग्णसंख्या शून्य आहे. आजही तालुक्यातील 36 गावे आणि वाड्यावस्त्यांमधून 76 जणांसह एकूण 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकूण रुग्णसंख्या आता 33 हजार 484 झाली आहे. त्यात शहरातील 6 हजार 11 तर ग्रामीणभागातील 27 हजार 471 रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील संक्रमणात पुन्हा वाढ झाल्याने प्रशासनाने तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी आणि आझमपूर या गावांमध्ये 14 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे.

गेल्या 30 सप्टेंबरपासून संगमनेर तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला होता. त्यामुळे तालुका आता कोविड संक्रमणाच्या जोखडातून मुक्त होतोय असे चित्र दिसत असतानाच सोमवारी तालुक्याच्या रुग्णसंख्येने अचानक उसळी घेत शंभरी पार केल्याने पुन्हा एका चिंता वाढल्या. एकीकडे जिल्ह्याच्या संक्रमणात वेगाने घट होत असतांना संगमनेर तालुका मात्र त्याला अपवाद ठरत असल्याने आत्तापर्यंत तालुक्यातील 27 गावे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करुन लागली असून त्यात सातत्याने वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्रही दिसू लागले आहे. कोविड नियमांकडे नागरिकांचे दुर्लक्ष आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे तालुका पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जातो की काय अशी भीतीही यानिमित्ताने व्यक्त होवू लागली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेचे 48, खासगी प्रयोगशाळेचे पाच आणि रॅपीड अँटिजेनच्या 29 निष्कर्षातून एकूण 82 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात कोपरागव तालुक्यातील एकासह साकूरमधील एका रुग्णाचे नाव दुबार नोंदविले गेले आहे. आजच्या अहवालात शहरातील चार रुग्णांचा समावेश असून इंदिरानगरमधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 65 व 47 वर्षीय महिलांसह 48 वर्षीय इसमाचा समावेश आहे. कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव येथील 30 वर्षीय तरुणाचाही आजच्या अहवालांमध्ये समावेश आहे.

ग्रामीण भागातील 46 गावांमधून आज 76 रुग्ण समोर आले असून त्यात वडगाव पान येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, संगमनेर खुर्द येथील 24 वर्षीय तरुण, कालेवाडीतील 50 व 35 वर्षीय महिलांसह, 29 वर्षीय तरुण, 23 व 22 वर्षीय तरुणी व दहा वर्षीय मुलीग, तळेगाव दिघे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम, 30 व 27 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 60, 26 व 25 वर्षीय महिलांसह 52 वर्षीय इसम, 35 व 34 वर्षीय तरुण, लोहारे येथील 63 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय मुलगा, काकडवाडीतील 27 वर्षीय तरुण, मांडवे येथील 35 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, साकूर येथील 36 व 34 वर्षीय तरुण, पानोडीतील 50 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला,

आश्वी खुर्द येथील 62 वर्षीय महिलेसह 48 वर्षीय इसम, पिंपरी येथील 16 वर्षीय मुलगा, शिबलापूर येथील 75 व 43 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 27 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 34 वर्षीय तरुण, कर्हे येथील 65 व 60 वर्षीय महिला, मालदाड येथील 53 व 45 वर्षीय महिलांसह 51 वर्षीय इसम व 27 वर्षीय तरुण, सोनेवाडीतील 37 वर्षीय महिला, घुलेवाडीतील चार वर्षीय बालक, कोठे बु. येथील 32, 30 व 23 वर्षीय तरुण, अकलापूर येथील 36 व 26 वर्षीय तरुण, झोळे येथील 56 वर्षीय इसमासह 50, 40 व 25 वर्षीय महिला, 24 व 22 वर्षीय तरुण, निमोण येथील 69 व 65 वर्षीय महिला, कासारे येथील 65 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथील 65 वर्षीय महिला, जोर्वे येथील 80 वर्षीय महिला,

वेल्हाळे येथील 78 वर्षीय महिलेसह 36 व 30 वर्षीय तरुण व सात वर्षीय मुलगा, पिंपळगाव येथील 21 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 45 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुणी व 15 वर्षीय मुलगा, गुंजाळवाडीतील 31 वर्षीय महिला, म्हसवंडी येथील 45 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 30 वर्षीय तरुणासह 23 वर्षीय तरुणी, आंबी खालसा येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 30 वर्षीय तरुण, नांदूर खंदरमाळ येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम व पिंपळे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.

