विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

नायक वृत्तसेवा, अकोले
सोमवारी (ता.4) विजांच्या कडाकडासह पडलेल्या पावसाने अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथील शेतकरी कैलास पुंजा डोके या शेतकर्‍याचा रात्री 1 वाजेच्या सुमारे गाढ झोपेत असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सद घटना समजताच माजी उपसभापती मारुती मेंगाळ, अगस्ति साखर कारखान्याचे संचालक सुरेश गडाख, पंचायत समिती सदस्य गोरख पथवे, आदिवासी ठाकर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पथवे, तालुकाध्यक्ष सुरेश पथवे, सचिव बाळासाहेब मधे, राजू सावंत, गुलाब तेलम, गोरख डोके, विलास आगिवले, भरत गिर्‍हे, काळू पथवे आदिंनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेत घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आणि आधार दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

Visits: 184 Today: 1 Total: 2124961

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *