राहुरी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील काही ठिकाणी सोमवारी (ता.4) रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

तालुक्यातील मल्हारवाडी, बारागाव नांदूरसह अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे. हावरीच्या ओढ्याला मोठा पूर आल्याने नांदूरचा राहुरीशी संपर्क तुटला आहे. टाकळीमियाँ परिसरात 67 मिमी पावसाची नोंद झाली असून ओढे-नाले फुल्ल होऊन शेतात पाणी शिरल्याने कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच चिंचविहीरे परिसरात ओढेनाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Visits: 174 Today: 1 Total: 2125179

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *