कांताबाई सातारकर यांच्यानंतर कन्या आणि नातवाचाही कोरोनाने मृत्यू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या निधनानंतर कुटुंब सावरण्याआधीच आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. कांताबाई यांची कन्या आणि नातवाचाही पाच-पाच दिवसांच्या अंतराने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अनिता उर्फ बेबीताई असं मुलीचं नाव असून अभिजीत उर्फ बबलू असं नातवाचं नाव आहे. अगदी 15 दिवसांमध्ये तिघांचाही कोरोनाने बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे. 25 तारखेला कांताबाई यांचं निधन झालं होतं. मात्र, त्या जाण्याअगोदरच त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई कोरोनाने गेल्या. यानंतर त्यांचा नातू बबलू याचही कोरोनाने निधन झालं. अधिक माहितीनुसार, काही दिवसांआधी खेडकर कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. अनिता यांचे संगमनेरमध्ये तर अभिजीत याचे नाशिकमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. अभिजीतला पत्नीनेच अखेरचा निरोप दिला. या एकामागोमाग घडलेल्या घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
