नगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादीलाच! आता उमेदवाराकडे लागले लक्ष; शिर्डीसाठी मात्र अद्याप ठरेना


नायक वृत्तसेवा, नगर
आगामी लकसभेच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहे. महायुतीच्या जागेबाबत अजून काही घडामोडी नसल्या तरी महाविकास आघाडीचे मात्र ४८ पैकी ३६ जागांबाबत एकमत झाले आहे आहे. विशेष म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे असणार आहे. शिर्डीबाबत मात्र अद्याप एकमत झाले नाही अशी माहिती मिळाली आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे आल्याने आता या जागेवर शरद पवार गट कोणाला रिंगणात उतरवणार याकडे नगरकरांचे लागले आहे.

लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत एकमत होणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण याआधी काँग्रेस राष्ट्रवादी असे समीकरण असायचे. परंतु आता यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना देखील समाविष्ठ आहे. परंतु आता या आघाडीला जागावाटपावर एकमत घडवण्यात काहीअंशी यश आले असल्याची माहिती मिळाली आहे. ३६ जागांवर एकमत असून १३ जागांवर चर्चा सुरू आहे. एकमत झालेल्या जागांची यादी अद्याप जाहीर नसली तरी त्यात नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आली असल्याची माहिती मिळाली आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २००९ पासून राष्ट्रवादीला यश मिळाले नसल्याचे दिसते. तीन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा राहिला असून २०१९ मध्ये डॉ. सुजय विखे हे भाजकडून खासदार झाले आहेत. नगरची जागा काँग्रेसला मिळावी असा सूर काँग्रेसमधून होता परंतु राष्ट्रवादी जागा सोडण्यास तयारी नव्हती त्यामुळे आता नगरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादीचाच असेल यावर एकमत झाल्याचे समजते.


उमेदवार कोण?
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीकडून आमदार प्राजक्त तनपुरेंचे नाव आघाडीवर आहे. परंतु अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके हेच शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशीही चर्चा सध्या एक गट खासगीत सांगत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे जाणार की शिवसेना (उद्धव ठाकरे गट) लढवणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता दक्षिणेत कोणता उमेदवार असेल याकडे लक्ष लागले आहे.

Visits: 37 Today: 2 Total: 113039

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *