संगमनेर मर्चंटस् बँक यूपीआय सेवा देणार ः मालपाणी बँकेची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येत्या दोन-तीन महिन्यांत लवकरच संगमनेर मर्चंटस् बँक यूपीआय सेवा बँक खातेदार व सभासदांना देऊन गुगल पे, फोन पे अशा सुमारे 200 अॅप सेवा उपलब्ध करुन देणार असल्याचे सूतोवाच बँकेचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी केले.

संगमनेर मर्चंटस् बँकेची 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 26 सप्टेंबर, 2021 रोजी कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे ऑनलाइन पध्दतीने उत्साहाच्या वातावरणात मालपाणी हेल्थ क्लब येथे राजेश मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संस्थेची सातत्यपूर्ण प्रगती आणि भविष्याच्या वेध घेणारी अचूक तंत्रज्ञान मैत्री याबद्दल असंख्य सभासदांनी बँकेची मुक्तकंठाने झूम अॅपवरुन प्रशंसा केली. सभेच्या सुरुवातीस श्री गणेश, श्री लक्ष्मी व श्री साईबाबांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन वार्षिक सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. सर्वप्रथम श्रध्दांजली अर्पण करुन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसचे वाचन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बजाज यांनी केले.
![]()
बँकेने सन 2020-21 सालात केलेल्या आर्थिक प्रगतीची आकडेवारी अध्यक्ष मालपाणी यांनी सभेमध्ये मांडून, त्यामध्ये बँकेस निव्वळ 3 कोटी 2 लाख 52 हजार रुपये नफा, 355 कोटी 3 लाख 84 हजार ठेवी, 235 कोटी 59 लाख 94 हजार कर्जवाटप व 145 कोटी 32 लाख 13 हजार रुपये गुंतवणूक झाल्याचे नमूद केले. बँकेचे स्वभांडवल व निधी 46 कोटी 17 लाख 93 हजार झाला असून एकूण मिश्र बिझनेस 590 कोटी 63 लाख 58 हजार झाल्याचे सांगितले. तसेच बँकेने आर्थिकदृष्ट्या भक्कम व सुयोग्य व्यवस्थापन असल्याबाबतचा रिझर्व्ह बँकेचा एफएसडब्ल्यूएम निकष गत 5 वर्षांपासून पूर्ण करुन बँकेस ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाल्याचे सांगितले. याशिवाय बँकेची सध्याची नेटवर्थ 30 कोटी 65 लाख ही 50 कोटी करुन नेट बँकिंग सेवा सभासद व खातेदारांना देण्याचा मनोदयही मालपाणी यांनी व्यक्त केला.

या सभेस उपाध्यक्ष संतोष करवा, विद्यमान अध्यक्ष दिलीपकुमार पारख, तज्ज्ञ संचालक सीए. संजय राठी, संचालक श्रीगोपाल पडतानी, सुनील दिवेकर, राजेंद्र वाकचौरे, प्रकाश राठी, डॉ. संजय मेहता, ओंकार सोमाणी, सतीश लाहोटी, गुरुनाथ बाप्ते, राजेश करवा, प्रकाश कलंत्री, संदीप जाजू, ज्ञानेश्वर कर्पे, डॉ. अर्चना माळी, ज्योती पलोड, तज्ज्ञ संचालक ओंकार बिहाणी, सेवक प्रतिनिधी तुकाराम सांगळे, राहुल जगताप, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बजाज, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ गांगल, संजय बागडे, बँकेचे अंतर्गत लेखा परीक्षक सीए. जितेंद्र लाहोटी इत्यादी उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष संतोष करवा यांनी आभार प्रदर्शन केले.
