हुतात्मा वीर कारखानाच्या दिशेने प्रवरेची वाटचाल ः कडू


नायक वृत्तसेवा, राहाता
हुतात्मा किसन वीर साखर कारखान्याचे नेतृत्व प्रतापराव भोसलेंनी केले. आज तो कारखाना एक हजार कोटींसह बुडाला आहे. हुतात्मा किसन वीर हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी होते. आज खरे तर त्यांच्या नावाला हे गालबोट आहे. तोच प्रसंग प्रवरेला येवू शकतो. किसन वीर कारखाना व प्रवरा कारखाना आज एकाचं बोटीने प्रवास करत असल्याची खंत अरुण कडू यांनी व्यक्त केली.

प्रवरा कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी प्रवरा ही परिसरातील शेतकर्‍यांची कामधेनू असून या परिसरातील वर्षानुवर्ष सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार यांच्या घामावर ही कामधेनू उभी असल्याचे अरुण कडू यांनी सांगत प्रवराचे आज एकूण गळीत 9 लाख 60 हजार असून त्यापैकी 5 लाख 62 हजार म्हणजे 65 टक्के उसाचे गाळप कार्यक्षेत्राबाहेरील असल्याचे नमूद केले. तसेच कार्यक्षेत्राबाहेरील उसाला येणारा वाहतूक व तोडणी खर्च सभासदांच्या माथी नको याला आमची हरकत आहे. कारखान्यातून होणार्‍या उपपदार्थाचा मोबदला सभासदांना दिला जात नाही. तसेज गणेश व प्रवरेच्या करारावर उच्च न्यायालयात याचिका दाखल असून ती न्यायप्रविष्ट आहे. त्यावर बोलणे उचित नाही. मात्र ज्याचा भावावर परिणाम होतो त्याबाबत सभेत बोलणे अनिवार्य आहे. बंद पडलेला व तोट्यात असलेले सर्व माथी मारुन गणेश कारखाना सन 2014 पासून चालवायला घेतला तो निर्णय अतिशय आत्मघातकी ठरलेला आहे. संपूर्ण व्यवहार सुरवातीपासून आजतागायत तोट्यात आहे. प्रत्येक वर्षाच्या अहवालाचे अवलोकन केले असता प्रत्येक वर्षे सन 2021 अखेर गणेश प्रीत्यर्थ 106 कोटीचा तोटा आपण सभासदांच्या माथी मारला आहे. गणेशचा हा तोटा व बँकेचे व्याज सभासदांच्या घामातुन पिकवलेल्या उसातून दिले जाते हे खेदजनक आहे. वर्षानुवर्ष खोडकी वाढे, इतर स्वरुपात अधिकचा भाव आपण दिवाळीला सभासदांना द्यायचो. त्यामुळे सभासदांची दिवाळी समाधानाची जायची. या दिवाळीला कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, सभासद शेतकर्‍यांना 300 रुपये द्यावेत अशी मागणी सभासदांच्यावतीने कडू यांनी केली. यावेळी एकनाथ घोगरे, बी.के.विखे, बबन कडू देखील ऑनलाइन सभेस उपस्थित होते.

Visits: 9 Today: 1 Total: 79400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *