बापरेऽ! एका दिवसांत सापडले तब्बल 84 रुग्ण! तालुक्यातील कोविडच्या रुग्णसंख्या वाढीने नोंदविला धक्कादायक विक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी सकाळी शासकीय, रात्री रॅपिड अँटीजेन आणि मध्यरात्री खासगी अशा तीन टप्प्यात हल्लाबोल करणार्‍या कोविडच्या विषाणूंनी कालच्या बुधवारी संगमनेरच्या रुग्णसंख्येत 84 रुग्णांची धक्कादायक भर घातली आहे. बुधवारी एकाच दिवसात तब्बल 84 रुग्ण समोर आल्याने संगमनेरच्या कोविड इतिहासात कालचा दिवस सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा विक्रम नोंदविणारा ठरला. बुधवारी रात्रीपर्यंत प्रशासनाकडून 62 रुग्णांचे तर आज सकाळी राहीलेल्या 22 जणांचे अहवाल जाहीर करण्यात आले. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येने अवघ्या 24 तासांतच थोड्या न् थिडक्या तर तब्बल 120 रुग्णांसह उसळी घेत थेट 1 हजार 515 रुग्णसंख्या गाठली आहे. अर्थात यातील केवळ 206 रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


बुधवारी (ता.26) सकाळी शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील माळीवाडा येथील 70 व खंडोबागल्लीतील 65 वर्षीय नागरिक, नंदनवन वसाहतीमधील 65 वर्षीय महिला, साळीवाडा परिसरातील 49 वर्षीय इसम व 30 वर्षीय महिला, कुरणरोड येथील 67 वर्षीय इसम, घासबाजारातील 36 वर्षीय महिलेसह 10 व पाच वर्षीय बालिका, गुंजाळवाडी शिवारातील गोल्डनसिटीतील 21 वर्षीय तरुण व रहाणेमळा येथील 29 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 41 वर्षीय तरुण, चिकणी येथील 28 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 65 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 50 वर्षीय इसम, पानोडी येथील 55 वर्षीय महिला, घारगावमधून 55 वर्षीय इसम, जवळे बाळेश्‍वर येथील 29 वर्षीय तरुण व साकूरमधील 65 वर्षीय महिला संक्रमित झाल्याचे समोर आले होते.


या अहवालानंतर आतात दिवसभर दुसरी अप्रिय वार्ता समोर येणार नाही असा समज करुन संगमनेरकर सायंकाळी गौराईच्या पूजनात आणि हळद-कुंकवाच्या कार्यक्रमात व्यस्त असतांना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रॅपिड अँटीजेन चाचणीच्या अहवालातून संगमनेरकरांना दुसरा आणि मोठा धक्का बसला. या चाणीतील निष्कर्षातून तालुक्यातील तब्बल 43 रुग्ण समोर आल्याने कालच्या बुधवारने दिवसभरात 62 रुग्णांची भर घातल्याने त्यापूर्वीचा एकाच दिवसांत 61 रुग्ण सापडण्याचा विक्रम तेथेच मोडीत निघाला. मात्र त्यावरही कोविडचे समाधान न झाल्याने मध्यरात्री खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून पुन्हा तालुक्याला दणका बसला आणि कालचा बुधवार 84 रुग्णांची भर घालीत संगमनेरकरांसाठी ‘काळा दिवस’ ठरला.


बुधवारी रात्री 10 वाजता प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजेनच्या अहवालातून शहरातील 11 तर तालुक्यातील बत्तीस संशयित रुग्णांची चाचणी पॉझिटिव आली. त्यात जनतानगरमधील 48, 26 व 19 वर्षीय महिला, खंडोबागल्लीतील 58 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, साळीवाडा परिसरातून 78 वर्षीय इसम, चैतन्यनगर येथील 65 वर्षीय महिला, माळीवाडा परिसरातील 60, 55 व 26 वर्षीय महिला तर उपासनी गल्लीतील 75 वर्षीय महिला तर गुंजाळवाडी येथील 52 वर्षीय इसमासह 43 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी व आठ वर्षीय बालक, कुरकुटवाडी येथील 46 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 49 व 37 वर्षीय पुरुषांसह 34 व 33 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालिका, वडगाव पान येथील 27 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 34 वर्षीय तरुण व तीस वर्षीय महिला, गोरक्षवाडीतील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 28 वर्षीय तरुण, 34 वर्षीय महिला व 9 वर्षीय बालिका, रहिमपूर येथील 65 वर्षीय महिला व 11 वर्षीय बालिका, चिकणी येथील 53 वर्षीय पुरुषांसह 48 वर्षीय महिला, राजापूरमधील अवघ्या 21 दिवसांची बालिका, संगमनेर खुर्द मधील 32 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 26 वर्षीय तरुणासह दोन वर्षीय बालिका व दोन वर्षीय लहान बाळं, पानोडी येथील 65 वर्षीय पुरुषांसह 20 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 57 व 50 वर्षीय महिलांसह 40 वर्षीय तरुण संक्रमित असल्याचे समोर आले.


कालच्या सकाळी शासकीय प्रयोगशाळेतील 19 व रात्री रॅपिड अँटीजेन चाचणीतील 43 अशा एकुण 62 रुग्णांची वाढ झाल्याने संगमनेरच्या बाधित संख्येने बुधवारी रात्री 1 हजार 493 रुग्णसंख्येसह पंधराव्या शतकाचा उंबरा गाठला. मध्यरात्री त्यात आणखी 22 रुग्णांची भर पडली. त्यामुळे संगमनेरच्या कोविड इतिहासात एकाच दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडण्याचा नवा विक्रमही प्रस्थापित झाला.


बुधवारी (ता.26) रात्री उशीराने प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील 14 तर तालुक्यातील 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या अहवालाने शहरातील अनेक नवीन भागात कोविडचा विषाणू पसरल्याचेही उघड झाले. त्यात गिरीराज विहार कॉलनीतील 64 वर्षीय इसम, वकील कॉलनीतील 54 वर्षीय इसम, नेहरु चौकातील 48 वर्षीय इसम, रहेमतनगरमधील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, इंदिरानगरमधील 52 वर्षीय महिलेसह 46 वर्षीय व 41 वर्षीय तरुण, स्वामी समर्थ नगरमधील 69 व 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 60 वर्षीय महिला, गणेशविहार कॉलनीतील 56 वर्षीय इसम, श्रीराम कॉलनीतील 57 वर्षीरू इसमासह 45 वर्षीय महिला व नवीन नगर रस्त्यावरील 56 वर्षीय इसम अशा एकुण 14 जणांचे अहवाल रात्री उशीराने प्राप्त झाले.


तर, तालुक्यातील गुंजाळवाडी येथील 27 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडीतील 69 वर्षीय महिलेसह 55 वर्षीय इसम व 30 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथील 35 वर्षीय महिला, साकूरमधील 41 वर्षीय तरुण व निमगाव जाळी येथील 32 वर्षीय तरुण अशा एकुण आठ जणांसह या अहवालातून 22 रुग्ण समोर आले. त्यामुळे बुधवारी दिवसभरात संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत 84 रुग्णांची भर पडल्याने बुधवारी सकाळच्या 1 हजार 431 रुग्णसंख्येवरुन तालुका थेट 1 हजार 515 वर जावून पोहोचला आहे. अर्थात सद्यस्थितीत यातील केवळ 206 रुग्ण सक्रीय संक्रमित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

  • तालुक्याची एकुण रुग्णांची संख्या 1 हजार 515
    एकुण सक्रीय संक्रमित असलेल्या रुग्णांची संख्या 206
    आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 38
    आत्तापर्यंत उपचार पूर्ण करुन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 282
    रुग्ण बरे होण्याचे तालुक्यातील सरासरी प्रमाण 84.62 टक्के

  • आत्तापर्यंत शासकीय झालेल्या तपासण्या –
    शासकीय प्रयोगशाळा 2 हजार 666
    खासगी प्रयोगशाळा 830
    रॅपिड अँटीजेन चाचणी 3 हजार 25
    आजवरची एकुण स्त्राव तपासणी 6 हजार 521
    पॉझिटिव्ह येण्याचे सरासरी प्रमाण 23.23 टक्के

Visits: 12 Today: 1 Total: 119138

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *