टाकेवाडीच्या पाझर तलावात तरुणाचा मृतदेह आढळला

टाकेवाडीच्या पाझर तलावात तरुणाचा मृतदेह आढळला
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जवळे बाळेश्वर गावांतर्गत असलेल्या टाकेवाडी येथील पाझर तलावाच्या पाण्यावर एका तरूणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. सदर घटना आज (सोमवारी ता.14) सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. तुषार सुभाष दिवटे (वय 27, रा.मिर्झापूर) असे या मयत तरुणाचे नाव आहे.


याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मिर्झापूर येथील तुषार दिवटे हा तरुण पिंपळगाव माथा येथील आपल्या मामांकडे आला होता. सोमवारी सकाळी टाकेवाडी येथील नागरिकांनी जवळे बाळेश्वरचे पोलीस पाटील रामनाथ वाळेकर यांना पाझर तलावाच्या पाण्यावर अज्ञात तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर याबाबतची माहिती घारगाव पोलिसांना दिली. माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस हवालदार आदिनाथ गांधले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांच्या मदतीने मयत तरुणाचा मृतदेह पाझर तलावातून बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह हा मिर्झापूर येथील तुषार दिवटे याचा असल्याचे सिद्ध झाले. पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह संगमनेर कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलीस पाटील रामनाथ वाळेकर यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आदिनाथ गांधले हे करत आहे.

Visits: 189 Today: 1 Total: 2123759

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *