महसूल मंत्र्यांनी विविध नागरिकांचे प्रश्न लावले मार्गी
महसूल मंत्र्यांनी विविध नागरिकांचे प्रश्न लावले मार्गी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यात सर्वप्रथम प्रभावीपणे राबविण्याच्या प्रशासनाला सूचना देत याबाबत आढावा बैठकीसह महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध व बाहेरुन आलेल्या नागरिकांच्या समस्या रविवारी (ता.13) सुरक्षित अंतराचे पालन करुन सोडविल्या.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा अतिथीगृह, यशोधन कार्यालय, एस.एम.बी.टी. दंत महाविद्यालय याठिकाणी अहमदनगर जिल्हा, नाशिकसह तालुक्यातून आलेल्या सर्व नागरिकांच्या विविध समस्या मंत्री थोरात यांनी जाणून घेत त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच कोरोनामुक्त महाराष्ट्र अंतर्गत राज्यभरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्याचे सुरु केले आहे. संगमनेर तालुक्यातील वाडी-वस्तीवर हे अभियान सुरु करण्यात आले असून तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना आरोग्यबाबतची माहिती दिली जाणार आहे. याप्रसंगी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व बाहेरुन आलेले कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.