सभासदांच्या विश्वासावर साधलेली प्रगती अभिमानास्पद ः गिरीश मालपाणी शारदा पतसंस्थेची एकोणतिसावी सर्वसाधारण सभा संपन्न
नाक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने उद्योग, व्यवसायांसह आर्थिक संस्थाही संकटात सापडलेल्या असतांना सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या पाठबळावर शारदा पतसंस्थेने साधलेली प्रगती अभिमानास्पद आहे. ठेवीदारांचा संस्थेवरील अतुट विश्वास आणि संचालक मंडळाची साथ या जोरावर संस्थेची ही घोडदौड यापुढेही कायम राहील असा विश्वास व्यक्त करतांना संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेल्या सभासदांना यावर्षी पाचशे रुपये दिवाळी भेट देण्यासह 15 टक्के लाभांश देण्याची घोषणा शारदा पतसंस्थेचे मार्गदर्शक तथा संचालक गिरीश मालपाणी यांनी केली. ते संस्थेच्या 29 व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी गेल्या आर्थिक वर्षाचे चेअरमन राजेश रा. मालपाणी होते.
संगमनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळ अधिक बळकट करण्यात शारदा नागरी सहकारी पतसंस्थेचा मोठा वाटा आहे. गेल्या तीन दशकांमध्ये संस्थेने आपल्या पारंपरीक कामाजाच्या पद्धतीत बदल घडवून कोअर बँकींग, आरटीजीएस, एनईएफटी, लॉकर्स यासार‘या मोठ्या बँकांच्या सुविधा सभासद व ग‘ाहकांना उपलब्ध करुन दिल्या. संस्थेने सभासदांच्या पाल्यांसाठी सुरु केलेली शैक्षणिक कर्जाची सुविधा पालकांना मोठा आधार देणारी ठरल्याचे प्रतिपादन राजेश रा. मालपाणी यांनी केले.
यावेळी संस्थेचे सभासद संदीप जाजू, डॉ.शशीकांत पोफळे, सीए.जितेंद्र लाहोटी, गणेशलाल बाहेती, विनोद बुब, कैलास कलंत्री, ओमप्रकाश आसावा, गुणसेन शहा, मनीष मालपाणी, राहुल बाहेती, प्रा.दत्ता गुजराथी व रमेश पर्बत आदी सभासदांनी विविध अभ्यासपूर्ण प्रश्न विचारण्यासह संचालक मंडळाला काही सूचनाही केल्या. प्रकाश कलंत्री व सीए कैलास सोमाणी यांनी संचालक मंडळाच्या कामकाजाचे कौतुक केले. सन 2020-21 सालचे चेअरमन राजेश रा. मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेस संचालक मंडळातील गिरीश मालपाणी, विद्यमान चेअरमन डॉ.योगेश भुतडा, व्हा.चेअरमन अमर झंवर, सुमित आट्टल, कैलास आसावा, सीए.संकेत कलंत्री, राजेश लाहोटी, रोहित मणियार, कैलास राठी, विशाल पडताणी, उमेश झंवर, सागर वाकचौरे, सोनाली नावंदर, रतिका बाहेती, जगदिश टोकसे, सोमनाथ कानकाटे, लक्ष्मीनारायण पलोड, राजकुमार पोफळे व व्यवस्थापक माधव भोर आदी उपस्थित होते.