संगमनेर तालुक्याचे संक्रमण आटोक्यात येईना! आजही शंभरी पारच; परवानगीशिवाय कोविड उपचार केल्यास होणार कारवाई..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या कोविड सरासरीत चढ-उतार नोंदविला जात असतांना संगमनेर तालुक्यात स्थिरावलेले संक्रण चिंता वाढवणारे ठरत आहे. तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असतांनाही त्याबाबत फारसे गांभीर्य दिसत नसल्याने परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकार्यांनी कोविड नियमांची सक्तिने अंमलबजावणी करण्याबाबत आदेश काढले असून पहिल्याच टप्प्यात तालुक्यातील 31 गावे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. रुग्णवाढीची श्रृंखला आजही कायम असून आज शहरातील पाच जणांसह 108 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 32 हजार 760 झाली आहे.
संगमनेर व पारनेर तालुका वगळता जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांच्या सरासरी रुग्णवाढीत मोठी घट होत आहे. एकीकडे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांतील संक्रमणाचा वेग थंडावत असतांना या दोन तालुक्यात दररोज समोर येणार्या मोठ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनही गोंधळलेल्या अवस्थेत होते. मोठ्या लोकसंख्येच्या जिल्हा मुख्यालयासारख्या ठिकाणची रुग्णसंख्याही एकदम आटोक्यात असतांना या दोन तालुक्यांमध्ये दररोज होणारा रुग्णसंख्येचा विस्फोट जिल्ह्याची सरासरी बिघडवणाराही ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या विभागागीय आयुक्तांनी कोविड नियमांची अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणा होत असल्याचा निष्कर्ष नोंदविला असून रुग्णांचा संपर्कशोध, सक्तिने विलगीकरण आणि परस्पर उपचारांवर सक्तिने कामय करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार संगमनेरचे तहसीलदार तथा इन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांनी रविवारी ग्रामसेवक, तलाठी व तालुक्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी स्वतंत्रपणे आदेश काढले असून त्याचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 56 अन्वये कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यानुसार यापुढे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोविड केअर सेंटर अथवा कोविड केअर हेल्थ सेंटर चालविण्याची परवानगी नसलेल्या कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाला कोविड बाधितांवर परस्पर उपचार करता येणार नाही. परवानगी नसलेल्या क्लिनिक अथवा रुग्णालयात असे रुग्ण आढळल्यास अथवा गृहविलगीकरणात ठेवून उपचार सुरु असल्याचे दिसून आल्यास अशी व्यक्ति कारवाईस पात्र असेल.
याशिवाय तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व तलाठी यांनाही स्वतंत्रपणे आदेश बजावण्यात आले असून प्रत्येक ठिकाणच्या तलाठ्याना संशयीत रुग्णाचा स्राव नमुना तपासणीसाठी दिल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईस्तोवर संबंधित संशयीत व्यक्ति सक्तिने विलगीकरणात राहील याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना गृहविलगीकरणाची पद्धत पूर्णतः बंद केल्याचे बजावण्यात आले असून यापुढे लक्षणे असणारी अथवा नसणारी बाधित व्यक्ति कोणत्याही स्थितीत संस्थात्मक विलगीकरणातच राहील असे सांगण्यात आले आहे. वरील आदेयाचा भंग केल्यास संबंधितावर कठोर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आदेशाचे कागदी घोडे नाचू लागले असतांना दुसरीकडे चढाला लागलेली तालुक्याची रुग्णसंख्या अद्यापही खाली येण्यास तयार नसल्याचे चिंताजनक चित्रही दिसत आहे. आजही शहरातील पाच जणांसह तालुक्यातील 101 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले. आजच्या रुग्णांमध्ये अन्य तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील सुयोग कॉलनीतील 29 वर्षीय महिलस, इंदिरानगर मधील 24 वर्षीय तरुण, गणेशनगर मधील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मदिना नगरमधील 52 वर्षीय महिला व संगमनेर येथील 47 वर्षीय महिला.
आज तालुक्यातील 44 गावे आणि वाड्या-वस्त्यांमधून 102 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यात वडगाव पान येथील 78, 70 व 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 58 व 48 वर्षीय इसम, 58 व 46 वर्षीय महिला, 35 व 28 वर्षीय तरुण व 14 वर्षीय मुलगी, कनोली येथील 78 व 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 73, 53 व 48 वर्षीय महिलस, 47 वर्षीय इसम व 33 वर्षीय तरुण, समनापूर येथील 48 वर्षीय महिला, झोळे येथील 52 वर्षीय इसम, माळेगाव हवेली येथील सात वर्षीय बालिका, तळेगाव दिधे येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण, कोल्हेवाडीतील 93, 70, 58 व 27 वर्षीय महिला, 81 व 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 52 वर्षीय इसम, 41 व 37 वर्षीय तरुण,
पिंपळे येथील 39 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 45 वर्षीय दोन इसम, जवळे कडलग येथील 45 वर्षीय इसम व 21 वर्षीय तरुण, बोटा येथील 80 व 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 80, 46, 39, 37 व 36 वर्षीय दोन महिला, 38, 24 व 22 वर्षीय तरुण व 17 वर्षीय मुलगा, वडगाव लांडगा येथील 53 वर्षीय इसमासह 36 व 34 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 34 वर्षीय तरुण, पिंपरी येथील 44 वर्षीय इसमासह 36 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 40 वर्षीय महिला व 34 वर्षीय तरुण, ओझर खुर्द येथील 28 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 35 वर्षीय तरुण व 35 वर्षीय महिला,
वरुडी पठार येथील 40 व 19 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 30 वर्षीय तरुण, निमोण येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 44 वर्षीय इसम व 36 वर्षीय तरुण, पारेगाव येथील 71 वर्षीय दोन वयोवृद्धांसह 63 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 62 वर्षीय महिला, डिग्रस मालुंजे येथील 50 वर्षीय महिलेसह 47 वर्षीय इसम व 25 वर्षीय तरुण, वनकुटे येथील 70 वर्षीय महिला, जवळे बाळेश्वर येथील 22 वर्षीय तरुणीसह दोन वर्षीय बालिका, शेडगाव येथील 35 वर्षीय तरुणासह 17 वर्षीय मुलगा, उंबरी बाळापूर येथील 15 वर्षीय मुलगा, पेमगिरीतील 65 वर्षीय महिला, दरेवाडीतील 60 वर्षीय महिला, मांडवे येथील 45 वर्षीय इसम, मनोली येथील 22 वर्षीय तरुण,
कोळवाडे येथील 22 वर्षीय तरुणीसह दोन वर्षीय मुलगा, चिंचोली गुरव येथील 26 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निळवंडे येथील 28 वर्षीय महिला, चंदनापूरी येथील 68 वर्षीय महिलेसह 42 व 33 वर्षीय तरुण व 20 वर्षीय तरुणी, पिंपरणे येथील सहा वर्षीय मुलगा, कासारवाडीतील 35 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 79 वर्षीय महिला, दाढ बु. येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शिबलापूर येथील 41 वर्षीय तरुण, पिंपळगाव येथील 54 वर्षीय इसम, वडझरी येथील 80 वर्षीय महिला व अंभोरे येथील 55 व 50 वर्षीय इसम तसेच श्रीरामपूर येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण 108 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 32 हजार 760 झाली आहे.