हिरेवाडीतून दहा टन ऊस चोरला

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या साकूर परिसरातील हिरेवाडी येथून शेतातून अंदाजे तीस हजार रुपये किंमतीचा तीस टन ऊस चोरुन नेल्याची घटना 10 सप्टेंबरपासून आजपावेतो दर दोन दिवसांनी घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साकूर परिसरातील हिरेवाडी येथील बाजीराव रामभाऊ खेमनर या शेतकर्याच्या शेतातून तात्याबा रामा खेमनर आणि भाऊसाहेब तात्याबा खेमनर या दोघांनी संगनमताने सुमारे 30 हजार रुपये किंमतीचा 10 टन ऊस चोरुन नेला आहे. या प्रकरणी बाजीराव खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांविरोधात गुरनं.217/2021 भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.एस.डी.टकले हे करत आहे.
Visits: 221 Today: 1 Total: 2128506
