अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला सीआयआयच्यावतीने 21 वा ‘एक्सलंट इन एनर्जी मॅनेंजमेंट 2020’चा एनर्जी एफिशियंट यूनिटचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली आहे.

कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी ऑटो इंजिनिअरिंग सेक्टर, बिल्डिंग सेक्टर, सिमेंट, मेटल्स, पावर प्लांट, पेपर इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टर, केमिकल इंडस्ट्री, फर्टिलायझर इंडस्ट्री, फार्मासिटिकल इंडस्ट्री, रिफायनरी, टेक्स्टाईल, शुगर आणि स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड इत्यादी क्षेत्रात विभागण्यात आली होती. या स्पर्धेत अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजने बिल्डिंग सेक्टर या विभागात सहभाग नोंदवला. या विभागात अमृतवाहिनीसह आंतरराष्ट्रीय विमानतळे, देशभरातील मोठे उद्योग समूह, बहुराष्ट्रीय कंपन्या, स्टार हॉटेल्स, हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स आणि शासकीय व निमशासकीय कार्यालये इत्यादी सहभागी झाले होते. या स्पर्धेची दोन श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली होती. 252 स्पर्धक अस्थापणे सहभागी असलेल्या या विभागातून एकमेव शिक्षण संस्था असलेल्या अमृतवाहिनी कॉलेजला एनर्जी एफिशियंट यूनिटचा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या यशाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, विश्वस्त बाजीराव खेमनर, शरयू देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ, लक्ष्मण कुटे, इंद्रजीतथोरात, अॅड.आर.बी.सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, प्रा.अशोक मिश्रा, प्रा.सुनील कडलग, प्रा.विजय वाघे यांनी अभिनंदन केले आहे.

