कोल्हार बुद्रुकमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील बाळासाहेब यशवंत लोखंडे याने आपल्या जवळच्या नात्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे.

याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाळासाहेब लोखंडे याने दि. 14 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर, 2021 रोजी अश्लील हातवारे करीत वाईट नजरेतून व अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ करत विनयभंग केला. यावरुन लोणी पोलिसांनी गुरनं.375/2021 भादंवि कलम 354 (अ), बाललैंगिक अधिनियम 2021 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीस अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी एका संघटनेचा जिल्हाध्यक्ष असल्याचे समजते.

Visits: 74 Today: 1 Total: 1098663

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *