पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत देशाची मान उंचावली ः भांगरे अकोले तालुक्यात विविध उपक्रमांनी पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा
नायक वृत्तसेवा, अकोले
आज भारत देशाची मान उंचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांतून चालू असून देश, देव अन धर्मासाठीचा लढा त्यांनी यशस्वी केला आहे, असे मत अकोले भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता.17) सेवा सप्ताह माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयात शहरातील गरीब भाजीपाला व्यावसायिक, चर्मकार यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उपसभापती दत्तात्रय देशमुख, सरचिटणीस यशवंत आभाळे, मच्छिंद्र मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे, शहराध्यक्ष सचिन शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक परशराम शेळके, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र नवले, बाबासाहेब आभाळे, कळसचे उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, दिव्यांग सेलचे संतोष वाकचौरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, एनटी सेलचे युवा जिल्हाध्यक्ष विजय पवार, उपाध्यक्ष नामदेव निसाळ, सागर वाकचौरे, कवीराज भांगरे, शिवाजी उंबरे, गोरख वाकचौरे, अमोल येवले, कुणाल वाकचौरे, अवधूत वाकचौरे यांनी केले होते. भारतीय जनता युवा मोर्चा एनटी सेलच्या वतीने शासकीय कार्यालयात मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सरचिटणीस सुशांत वाकचौरे व युवा अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी वाटप केले. तर मुळा विभागाच्यावतीने लहीत खुर्द येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तालुका सचिव रेश्मा गोडसे, विद्या परशुरामी, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव मंदा बराते आदिंनी वाढदिवसाच्या निमित्ताने लसीकरण केंद्रावर नागरिकांना मदत केली.