देवळाली प्रवरा हेल्प टीम निवडणुकीत उतरणार

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार व पक्षही आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, देवळालीच्या विकासाच्या व स्वच्छ प्रशासनाच्या मुद्यावर देवळाली प्रवरा हेल्प टीमही आता दंड थोपटून निवडणुकीच्या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे संकेत निवृत्त अभियंता दत्ता कडू यांनी दिले आहेत.

याविषयी कडू म्हणाले, देवळाली प्रवरा शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यात तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास सत्तारुढ पक्ष सपशेल अपयशी ठरला आहे. याच सत्तारुढ गटाचे नगरसेवक कोलांट उड्या मारून पुन्हा मतांचा जोगवा मागण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नगरपालिकेत भक्कम व विकासाभिमुख पर्याय देण्याची गरज असून देवळाली प्रवरा हेल्प टीम नगरपरिषदेच्या आखाड्यात उतरून शहरवासियांना चांगला पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून या टीमचे अध्यक्ष दत्ता कडू यांनी देवळाली प्रवरा येथे देवळाली प्रवरा हेल्प टीमच्या बैठकीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

Visits: 151 Today: 3 Total: 1577741

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *