परिपूर्ण मराठीसाठी पत्रकारिता अभ्यासक्रम उपयुक्त ः डॉ.मालपाणी
परिपूर्ण मराठीसाठी पत्रकारिता अभ्यासक्रम उपयुक्त ः डॉ.मालपाणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील संगमनेर महाविद्यालयाच्या पत्रकारिता अभ्यासक्रम विभागाचा अहमदनगर बरोबरच शेजारच्या जिल्ह्यातही एक वेगळा लौकिक तयार झाला आहे. पत्रकारिता करू इच्छिणार्यांबरोबरच अनेक शिक्षक भाषा आणि लेखन कौशल्य शिकण्यासाठी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात ही महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी केले.
पुणे विद्यापीठाचे पुण्याबाहेरील एकमेव अभ्यासकेंद्र असलेल्या संगमनेर महाविद्यालयात मागील आठ वर्षांत ज्येष्ठ पत्रकार डॉ.संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, नोकरदार, गृहिणी आदिंनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पत्रकारितेच्या मुद्रित माध्यमाबरोबरच दूरचित्रवाणी आणि नभोवाणीची पत्रकारिता कशी करावी याचे परिपूर्ण ज्ञान संगमनेर महाविद्यालयाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिले जात आहे. याचा उपयोग करून अनेक विद्यार्थी आज पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच परिपूर्ण मराठी भाषा जाणीवपूर्वक शिकावी लागते. त्यामुळे नोकरी, व्यवसाय करून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारांसाठी प्रत्येक रविवारी या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यात येतात. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात, अशी माहिती शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.मालपाणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्यांनी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड (9822811761) किंवा अभ्यासक्रम समन्वयक प्रा.सुशांत सातपुते (9766760926/8263865412) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही डॉ.मालपाणी यांनी केले आहे.