… तरच काँग्रेस विचाराचे लोकप्रतिनिधी निवडले जातील ः तांबे

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कार्यकर्ता सक्षम बनला पाहिजे. यासाठी चळवळीतून कार्यकर्ते घडले पाहिजे. तरच भविष्यात लोकसभा व विधानसभेतून काँग्रेस विचाराचे लोकप्रतिनिधी निवडले जातील असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले.

अकोले शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे गुरुवारी (ता.9) राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस व प्रवक्तेपदी उत्कर्षा रुपवते यांची निवड झाल्याबद्दल व किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विक्रम नवले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार, कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व पक्ष कार्यकर्ता मेळावा ज्येष्ठ शेतकरी नेते मधुकर नवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी तांबे बोलत होते. याप्रसंगी लक्ष्मण साबळे, मीनाक्षी शेंगाळ, अशोक माळी, मंगेश पिचड, हितेश मुठे, बाळू वाजे, रोहिदास घोडे, प्रकाश धांडे, सुलोचना कोकाटे, ज्योती सालकर, प्रवीण साबळे, सखाराम भांगरे, मारुती देशमुख, शांताराम सांगळे, नाथू भांगरे, साहेबराव पोरे, अंकुश देशमुख, अविनाश पवार, रखमा धिंदळे, जयराम वाजे, प्रशांत धराडे, भगवान भांगरे, ठकूबाई निगळे, धोंडिबा गोंदके, लक्ष्मण गोंदके, बाळासाहेब कोटकर, पोपट कोटकर आदिंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर ज्ञानदेव वाफारे, गणपत सांगळेे, मीनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे, शोभा निर्गुडे, मंदा नवले, संगीता शेटे, शिवाजी नेहे, बाळासाहेब नाईकवाडी, ज्ञानेश्वर झडे, रमेश जगताप, बाळासाहेब शेटे, आरिफ तांबोळी, अमोल नाईकवाडी, रमेश नाईकवाडी, भास्कर दराडे, संपत कानवडे, रामदास धुमाळ, साईनाथ नवले, सुजित नवले, अनिल शेटे, भास्कर मंडलिक, सचिन जगताप, शब्बीर शेख, महिपाल देशमुख, वनिता शेटे आदी उपस्थित होते.

Visits: 4 Today: 2 Total: 30689

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *