उद्योजिका राजश्री गागरेंना पुरस्कार प्रदान

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील मूळच्या लोणी आणि भोसरी येथील उद्योजिका राजश्री गागरे यांना नुकतेच ‘वूमन ऑफ इन्फ्लुअन्स अ‍ॅवॉर्ड 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे.

व्यवसायासोबतच सामाजिक भान म्हणून अखिल भारतीय दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून बालसंस्कार, युवा प्रबोधन, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता यामध्ये उद्योजिका राजश्री गागरे या कार्यरत आहे. तसेच विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान, अध्यात्म व सकारात्मकता या विषयावरही मार्गदर्शन करत असतात. समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना मदत तसेच लघु उद्योगाबद्दल मार्गदर्शन करून महिला सक्षमीकरणाचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. याच कामांची दखल घेऊन हडपसर (पुणे) येथील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स येथे उदगम केअर फौंडेशन तर्फे ‘वूमन ऑफ इन्फ्लुअन्स अ‍ॅवॉर्ड 2020’ने पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील 50 महिलांना देखील सन्मानित करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळे, अभिनेते अमोल देवण, पूर्णिमा लुणावत आदी उपस्थित होते. उदगम केअर फौंडेशनच्या अध्यक्षा नेहा वर्मा यांनी शेवटी आभार मानले.

Visits: 96 Today: 1 Total: 1114095

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *