रोटरी क्लब संगमनेर तर्फे 61 शिलाई मशिनचे वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना महामारीमध्ये घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या भगिनींनी त्यांच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांचे पुढील आयुष्य आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावे. यासाठी रोटरी क्लब संगमनेर तर्फे अहमदनगर जिल्ह्यातील 61 महिला भगिनींना नुकतेच शिलाई मशीनचे मोफत वितरण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रोटरी 31-32 चे सहाय्यक प्रांतपाल दिलीप मालपाणी, रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष योगेश गाडे, सचिव हृषीकेश मोंढे, माजी अध्यक्ष पवनकुमार वर्मा, प्रकल्प प्रमुख योगेश बारड आदी मान्यवर उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील 53, अकोले तालुक्यातील 6, श्रीरामपूर व पारनेर तालुक्यातील प्रत्येकी 1 महिला यांना या शिलाई मशीन वितरित करण्यात आल्या. तसेच या प्रकल्पासाठी मदत करणार्‍या 46 दात्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन संजय कर्पे, सम्राट तवरेज व डॉ. सागर गोपाळे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष महेश वाकचौरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी खजिनदार मयूर मेहता, दीपक मणियार, अण्णासाहेब शेलकर, मोहित मंडलिक, अजित मंडलिक व इतर रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व महिलांना मशिन घरी कशी नेता येईल यासाठी रोटरी सदस्यांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *