संगमनेर तालुक्यातील कोविड प्रादुर्भावात चिंताजनक वाढ! तालुक्याने ओलांडला 29 हजारांचा टप्पा; कोविड शून्य गावात पुन्हा आढळताहेत रुग्ण..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड बाधितांची एकूण संख्या एका ठराविक आकड्याभोवती स्थिरावलेली असतांना जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मात्र रोजच रुग्णसंख्येचा चढउतार बघायला मिळत आहे. त्यातही संगमनेर तालुक्यातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने तालुक्याच्या चिंता वाढल्या आहेत. आजही मागील दहा दिवसांत तब्बल तिसर्‍यांदा तालुक्याने दोनशे रुग्णांचा टप्पा ओलांडला असून आज शहरातील दहा जणांसह एकूण 209 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्येने आता 29 हजारांचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 29 हजार 160 झाली आहे. आजच्या स्थितीत तालुक्यात जिल्ह्यातील उच्चांकी 1 हजार 215 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.


जुलैपासून जिल्ह्यातील कोविड संक्रमणाला ओहोटी लागल्याचे दिलासादायक चित्र निर्माण होत असतांना संगमनेरसह पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी व अकोले तालुक्यातील रुग्णसंख्येला मात्र गती मिळाल्याने जिल्ह्याच्या सरासरीवर त्याचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील सर्वाधीक लोकसंख्येचे क्षेत्र असलेल्या अहमदनगर महापालिका परिसरातील संक्रमणातही गेल्या मोठ्या कालावधीपासून एकसारखी घट झाली असून तेथील सरासरी रुग्णगती थेट 23 रुग्ण प्रतिदिवसावर पोहोचलेली असतांना संगमनेरसारख्या पाच लाख लोकसंख्येच्या तालुक्यात मागील अवघ्या दहाच दिवसांत सरासरी 171 रुग्ण प्रतिदिवस इतक्या प्रचंड गतीने तब्बल 1 हजार 711 रुग्णांची भर पडली आहे. यावरुन तालुक्यात वाढत असलेल्या संक्रमणाचा सहज अंदाज बांधता येतो.


मागील दहा दिवसांत आज तिसर्‍यांदा संगमनेर तालुक्यातून दोनशेहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. शासकीय प्रयोगशाळेचे 45 आणि खासगी प्रयोगशाळा व रॅपीड अँटीजनेच्या प्रत्येकी 82 अहवालांमधून आज तालुक्यातील 209 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील दहा, पठारभागातील 35 व अन्य तालुक्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालातून शहरातील सुयोग सोसायटीतील 38 वर्षीय महिला, देवाचा मळा परिसरातील 20 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 40 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 58 व 52 वर्षीय इसमासह 55 वर्षीय महिला, 40 वर्षीय दोघे व 27 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


यासोबतच तालुक्याच्या ग्रामीणभागातील चिंचोली गुरव येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पोखरी हवेलीतील 85 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 70 वर्षीय दोन, 65, 62 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 65 व 60 वर्षीय महिला, निमगाव येथील 75 व 70 वर्षीय महिलांसह 20 वर्षीय तरुणी, गुंजाळवाडीतील 67, 46, 45 व 24 वर्षीय महिला, 52 वर्षीय इसम, 20 वर्षीय तरुणी व 13 वर्षीय मुलगा, राजापूर येथील 26 वर्षीय तरुण, शिंदोडी येथील 30 वर्षीय तरुण, कोठे खुर्द येथील 41 वर्षीय महिला, तिगांव येथील 69 व 60 वर्षीय महिला, खांडगाव येथील 58 व 43 वर्षीय इसमासह 40 व 38 वर्षीय तरुण, 35 व 23 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 22 वर्षीय तरुणी, निमज येथील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 50 वर्षीय इसम व 12 वर्षीय मुलगा,


तळेगाव दिघे येथील 70 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम, 52, 40 व 25 वर्षीय महिला, 25 व 22 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगा, रणखांब येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 55 वर्षीय इसमासह 48 व 28 वर्षीय महिला, 31 व 19 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 56 व 45 वर्षीय इसमांसह 43 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कनोली येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 59 वर्षीय इसम, 63 व 55 वर्षीय महिला, 36 व 35 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 60 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 21 वर्षीय तरुण, मनोलीतील 52 वर्षीय इसमासह आठ वर्षीय मुलगा,


पारेगाव बु. येथील 83 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, कोल्हेवाडी येथील 21 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द येथील 33 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 80, 34 व 24 वर्षीय महिला, 56 वर्षीय इसम व 22 वर्षीय तरुणी, जाखुरी येथील 46 वर्षीरू इसम, वडगाव लांडगा येथील 30 वर्षीय तरुण, वडझरी बु. येथील 46 व 40 वर्षीय महिलांसह 43, 40 व 31 वर्षीय तरुण, डिग्रेस येथील 20 वर्षीय तरुणी, आश्‍वी खुर्द येथील 70 वर्षीय महिला, खंदरमाळ येथील 30 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 65 व 27 वर्षीय महिलांसह 18 वर्षीय तरुण, नांदूर येथील 52 वर्षीय इसमासह 13 वर्षीय मुलगी, निमगाव भोजापूर येथील 49 वर्षीय इसम, वडझरी खुर्द येथील 40 वर्षीय महिला, मेंढवण येथील 24 वर्षीय महिला,


कासारे येथील 44 वर्षीय इसम, देवगाव येथील 40, 30, 28 व 26 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 21 वर्षीय तरुणी, समनापूर येथील 50 वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथील आठ वर्षीय मुलगा, वाघापूर येथील 46 वर्षीय इसमासह 20 व 19 वर्षीय तरुणी, वडगाव पान येथील 43 वर्षीय महिला, कौठे मलकापूर येथील 65 व 32 वर्षीय महिलांसह 41, 32 व 17 वर्षीय तरुण, 17 वर्षीय तरुणी, चंदनापूरी येथील 41, 30, 29, 27 व 21 वर्षीय तरुण, कर्‍हे येथील 28 वर्षीय तरुणासह दोन वर्षीय बालक, सायखिंडीतील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 49 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुणी, 11 वर्षीय मुलगा व आठ वर्षीय मुलगी, साकूर येथील 39, 35 व 19 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला व 15 वर्षीय मुलगी, माळवाडीतील 44 वर्षीय इसम,


निमोण येथील 39 व 35 वर्षीय महिलांसह 17 वर्षीय तरुणी, मांडवे खुर्द येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 60 वर्षीय महिला व 42 वर्षीय तरुण, सादतपूर येथील 27 वर्षीय तरुण, काकडवाडीतील 40 व 18 वर्षीय तरुणांसह 28 वर्षीय महिला, घारगाव येथील 45 वर्षीय महिलेसह 40 व 30 वर्षीय तरुण व 12 वर्षीय मुलगी, पेमगिरीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम, 50 व 34 वर्षीय महिला व 32 वर्षीय तरुण, चिखलीतील 50 व 45 वर्षीय इसम, पिंपळगाव माथा येथील 91 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 61 व 35 वर्षीय महिला, झरेकाठी येथील 38 वर्षीय तरुण, जांभुळवाडी तयेथील 50 वर्षीय इसम, हिवरगाव पठारावरील 85 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, पानोडीतील 80 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 52 वर्षीय इसम, 32 व 23 वर्षीय तरुण, 28 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 15, 14 व 13 वर्षीय मुले व 11 वर्षीय मुलगी, कोठे बु. येथील 50 वर्षीय महिला,


पिंपरी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 वर्षीय दोघे, 35 वर्षीय दोघे, 21 व 20 वर्षीय तरुण व 16 वर्षीय तीन मुले, झोळे येथील 27 वर्षीय तरुण, ओझर येथील 32 वर्षीय तरुण, कान्हेगाव येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मांडवे बु. येथील 35 वर्षीय तरुणासह 11 वर्षीय मुलगी, रायते येथील 60 वर्षीय महिला, दाढ खुर्द येथील 22 वर्षीय तरुण, आश्‍वी बु. येथील 21 व 18 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 45 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 55 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण व शिबलापूर येथील 16 वर्षीय मुलाचा बाधितांमध्ये समावेश आहे. याशिवाय अन्य तालुक्यातील राहाता येथील 49 व 28 वर्षीय महिलांसह 30 वर्षीय तरुण, पोहेगाव येथील 21 वर्षीय तरुणी, कळस येथील 34 वर्षीय तरुण, चिकलठाणा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 वर्षीय महिला व गणेारे येथील 45 वर्षीय महिलेचाही त्यात समावेश आहे.


आज जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येतही वाढ झाली असून 901 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या अहवालातून संगमनेर 209, पारनेर 136, श्रीगोंदा 130, पाथर्डी 80, अकोले 60, राहाता 46, शेवगाव 37, राहुरी 34, जामखेड 31, नेवासा 29, नगर ग्रामीण 28, कोपरगाव 23, श्रीरामपूर 18, अहमदनगर महापालिका क्षेत्र 15, कर्जत 13, इतर जिल्ह्यातील 11 व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 3 लाख 25 हजार 134 झाली असून आत्तापर्यंत 3 लाख 12 हजार 793 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील एकूण 5 हजार 789 जणांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत 6 हजार 552 जणांचा कोविडने बळी घेतला आहे. जिल्ह्यातील रुग्ए बरे होण्याचा सरासरी दर आता 96.20 झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *