सहकार चळवळ निकोपपणे टिकवावी ः थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकेचे मोठे योगदान असून यावेळची निवडणूक पक्षविरहित सर्वांना बरोबर घेत बिनविरोध केली. सहकार चळवळ ही आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठीची व्यवस्था आहे. ती सर्वांनी निकोपपणे जपली पाहिजे आणि टिकविली पाहिजे, असे आवाहन काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या संगमनेर शाखेतील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात तालुक्यातील 100 टक्के वसुली देणार्‍या 16 सेवा सोसायट्यांचा व 35 शाखांचा नुकताच गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधव कानवडे हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, बँकेचे संचालक गणपत सांगळे, प्रशांत गायकवाड, माजी उपाध्यक्ष रामदास वाघ, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, लक्ष्मण कुटे, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, उपनिबंधक गणेश पुरी, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते. याप्रसंगी सन 2020-2021 या सालामध्ये शंभर टक्के वसुली देणार्‍या जोर्वे, देवकौठे, वडझरी, निंबाळे, घुलेवाडी, कुंभारवाडी, शिरसगाव धुपे, सांगवी, आनंदवाडी, वरुडीपठार, कौटेवाडी, म्हसवंडी, आंबीदुमाला, बोटा, चिखली, निमगाव भोजापूर या 16 सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांचा सन्मान केला. तर 100 टक्के वसुली असणार्‍या बँकेच्या 35 शाखाधिकार्‍यांचाही सन्मान करण्यात आला. स्वागत तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार प्रदर्शन वसुली अधिकारी उल्हास शिंदे यांनी केले.

Visits: 95 Today: 1 Total: 1105846

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *