रेड स्वस्तिक सोसायटीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोते

नायक वृत्तसेवा, अकोले
रेड स्वस्तिक सोसायटीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लिज्जत पापड उद्योग समूहाचे सुरेश कोते यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे. पुणे येथे झालेल्या संस्थेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

रेड स्वस्तिक सोसायटीच्या भारतात 65 शाखा कार्यरत आहे. या शाखांच्या माध्यमातून देशातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्य सेवा दिल्या जातात. कोरोना काळात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले त्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. यात अन्नधान्य वाटप, रुग्णवाहिका सेवा, जनजागृती व औषधोपचार आदी कामे करण्यात आले. पुणे येथे हॉटेल प्रेसिडेंटमध्ये संस्थेची ही बैठक पार पडली. यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी औरंगाबाद येथील उद्योजक भगवान राऊत यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक टी. एस. भाल, हेमंत गोरे, अशोक शिंदे, बिपीन पटेल, डॉ. रंजनबेन कोठारी, तुषार देसाई, प्रमोद नांदगावकर, कॅ. ओमप्रकाश दहीवाल, डॉ. डोळस, डॉ. सुपे आदी उपस्थित होते.
