लायन्स क्लब ऑफ संगमनेरचे बालसुधार गृहात रक्षाबंधन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने बालसुधार गृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षा सुनीता पगडाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या पद्मादीदी व डॉ.योगिनी दीदी उपस्थित होत्या. दोघींनीही आपल्या ओघवत्या वाणीमध्ये रक्षाबंधनाच्या महतीविषयी मुलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बालसुधार गृहातील 22 मुलांना राख्या बांधल्या व मिठाईसह बिस्कीट पुडे वाटली. बिस्किटे पद्मा टाक यांनी तर मिठाई डॉ. योगिनी दीदी यांनी उपलब्ध करुन दिली. तसेच स्कूल बॅगचेही वाटप करण्यात आले. स्कूल बॅग कामिनी देसाई यांनी उपलब्ध करुन दिल्या. तर पद्मा कलंत्री यांनी उत्स्फूर्तपणे मुलांसाठी टॉवेल्स आणली. इतक्या वस्तू मिळाल्याने मुले अगदी आनंदून गेली होती. तालुका कृषी अधिकारी प्रमोद शेंडे, कॅबिनेट ऑफिसर एमजेएफ डॉ.सुचित गांधी, झोन चेअरमन श्रीनिवास पगडाल यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. वंचित मुलांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्याचा आनंद मिळाल्याचे समाधान लाभल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शेवटी सर्व मुलांना राजेश लाहोटी यांनी स्वादिष्ट भोजन दिले. या कार्यक्रमासाठी सीए.बापूसाहेब टाक, एमजेएफ डॉ.राजन ठाकूर, कॅबिनेट ऑफिसर ललित देसाई, राजेंद्र सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, क्लब सचिव राखी करवा, कॅबिनेट ऑफिसर संतोष करवा, डॉ.अबोली गांधी, अमोल खटाटे, प्रकाश कलंत्री, नंदकिशोर बेल्हेकर, सुरेश दुर्गुडे, डॉ.नेहा पगडाल, सुधार गृहाचे शिक्षक आमले आदिंनी परिश्रम घेतले.

Visits: 10 Today: 1 Total: 79315

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *