जिल्ह्याच्या कोविड रुग्णसंख्येतील चढ-उतार आजही कायम! संगमनेरात आजही उच्चांकी रुग्ण; पठारभागातून मिळाला काहीसा दिलासा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या कोविड संक्रमणातील चढ-उतार आजही कायम असून अहमदनगर, जामखेड व कोपरगाव वगळता उर्वरीत संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णसंख्या गुरुवारच्या तुलनेत कमी झाली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येवर झाला असून दैनिक रुग्णांची संख्या साडेसहाशेच्या घरात आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठारभागातही आज काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले असून गुरुवारी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदविल्यानंतर तेथील रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. आज संगमनेर तालुक्यातून 140 जणांसह अन्य तालुक्यातील एक अशा एकूण 141 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्येने 27 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील अकरा तर पठारभागातील 31 रुग्णांचा समावेश आहे.
राज्यातील कोविड संक्रमणाची गती कमी झाल्याने राज्य शासनाने स्वातंत्र्य दिनापासून निर्बंध शिथील केले आहेत. संगमनेर तालुक्याचा विचार करता महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच अपवाद वगळता तालुक्यात दररोज तीन आकडी रुग्ण समोर येत आहेत. निर्बंध शिथील झाल्यानंतर त्यात काही प्रमाणात वाढ झाली असून सरासरी दररोज उंचावत आहे. गेल्या दोन दिवसांती उच्चांकी रुग्णवाढीने तालुक्याचा सरासरी वेग थेट 131 रुग्णांवर नेवून पोहोचवला असून दुसर्या क्रमांकाच्या पारनेर तालुक्याचा सरासरी रुग्णवाढीचा वेग 96 आहे. यावरुन संगमनेर तालुक्यातील संक्रमणातील गती सहज लक्षात येते. नागरिकांकडून कोविड नियमांकडे दुर्लक्ष, पोलीस प्रशासनाची एकाच भागातील कारवाई, प्रशासनासह आरोग्य यंत्रणांकडून रुग्ण व त्याचा संपर्क शोधण्यात चालढकल आणि खासगी रुग्णालयांचा मनमानीपणा यामुळे तालुक्यातील संक्रमण आजही टिकून आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 13, खासगी प्रयोगशाहेचे 107 व रॅपीड अँटीजेनच्या 24 अहवालातून तालुक्यातील 144 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील 11 व पठारभागातील 31 रुग्णांसह अन्य तालुक्यातील एक व तालुक्यातील तिघांची नावे दुबार आली आहेत. आजच्या अहवालातून शहरातील मालदाड रोडवरील 43 व 36 वर्षीय तरुण, सावतामाळी नगर येथील 26 वर्षीय तरुण, घोडेकर मळ्यातील 42 वर्षीय तरुण, शिवाजीनगर येथील 33 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 40, 38 व 36 वर्षीय महिला, 30 वर्षीय तरुण, 12 व 8 वर्षीय मुलाचा समावेश आहे. वरवंडी येथील 42 वर्षीय तरुणासह 38 वर्षीय महिला व शिवाजीनगर येथील 33 वर्षीय तरुणाचे नाव दोनवेळा नोंदविले गेले असून सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील 30 वर्षीय तरुणाचाही तालुक्याच्या बाधित रुग्णांमध्ये समावेश आहे.
तालुक्याच्या पठारभागातील सतरा गावे आणि वाड्यावस्त्यांमधून आज 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात अकलापूर येथील 24 व 21 वर्षीय तरुण, कालेवाडीतील 75 वर्षीय महिला, वरवंडी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42 व 40 वर्षीय तरुण व 38 वर्षीय महिला, नांदूर येथील 18 वर्षीय तरुणी, कोठे बु. येथील तीन वर्षीय बालक, शिंदोडी येथील 30 वर्षीय तरुण, खंदरमाळ येथील 23 वर्षीय तरुण, नांदूरी दुमाला येथील तीन वर्षीय बालक, रणखांब येथील 50 वर्षीय इसमासह 36 व 21 वर्षीय तरुण, देसवडे येथील 65 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 63 वर्षीय महिलेसह 54 वर्षीय इसम, 37 वर्षीय तरुण व दहा वर्षीय मुलगी, मांडवे बु. येथील 72, 64 व 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 60 वर्षीय महिला, घारगाव येथील 33 वर्षीय तरुणासह 32 वर्षीय महिला, शेंडेवाडी येथील 55 वर्षीय महिला, हिरेवाडीतील 33 वर्षीय तरुण, दरेवाडी येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 वर्षीय महिला व खांबे येथील 35 वर्षीय तरुण,
तर तालुक्यातील 45 गवांमधून आज 98 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात पावबाकी येथील 24 वर्षीय तरुण, निमज येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 22 वर्षीय तरुण, पळसखेडे येथील 40 व 25 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 50 वर्षीय महिला, काकडवाडी येथील 55 वर्षीय महिला, धांदरफळ येथील 55 वर्षीय इसमासह 35, 34 व 30 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी, दहा व सहा वर्षांची मुले, पारेगाव बु. येथील 50 वर्षीय महिला, सादरतपूर येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कनोली येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 35 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी व 18 वर्षीय तरुण, निळवंडे येथील 49 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 42 व 25 वर्षीय तरुण,
पोखरी हवेली येथील 70, 55, 44, 41, 33 व 25 वर्षीय महिला, 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम, 38, 30 व 24 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुणी, 14, 13 व सहा वर्षीय मुली, 13, 10 व सहा वर्षीय मुले, मंगळापूर येथील 45 वर्षीय इसम, मालुंजे येथील 35 व 26 वर्षीय महिलांसह 19 वर्षीय दोन तरुण व सहा वर्षीय मुलगा, घुलेवाडीतील 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 व 45 वर्षीय इसम, 40 वर्षीय महिला व 10 वर्षीय मुलगी, कोकणगाव येथील 31 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 35 वर्षीय महिला, चिखली येथील 70 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 16 वर्षीय मुलगा, निमोण येथील 30 वर्षीय तरुण, राजापूर येथील 25 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 40 वर्षीय महिला,
आश्वी बु. येथील 43 वर्षीय महिला, मनोली येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 31 वर्षीय तरुण व 30 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 11 वर्षीय मुलगी, हिवरगा पावसा येथील 23 वर्षीय महिला, कुरण येथील 51 वर्षीय इसम, रहिमपूर येथील 17 वर्षीय मुलगा, शेडगाव येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय महिला, सायखिंडीतील 42 वर्षीय तरुण, निमगाव बु. येथील 57 वर्षीय इसम, निमगाव टेंभी येथील 52 वर्षीय इसम, खळी येथील 15 व 12 वर्षीय मुले, चिकणी येथील 49 वर्षीय इसमासह 30 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 59 व 47 वर्षीय इसमांसह 24 वर्षीय महिला, पारेगाव खुर्द येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडीतील 65 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम, कासारा दुमाला येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 60 वर्षीय महिला व 29 वर्षीय तरुण,
तिगांव येथील 22 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 25 वर्षीय तरुण, पिंपरी येथील 58 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण, 35 वर्षीय महिला व 17 वर्षीय मुलगी, पिपळे येथील 38 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 59 वर्षीय इसमासह 55 वर्षीय महिला व ओझर येथील 45 वर्षीय इसम अशा एकूण 141 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या आता 27 हजारांचा पल्ला ओलांडून 27 हजार 93 झाली आहे. तालुक्यात सध्या एक हजारांहून अधिक रुग्ण संक्रीय संक्रमित असून आत्तापर्यंत तालुक्यातील 417 जणांचा बळी गेला आहे.