शिक्षकांनी आदर्श नागरिक निर्माण करावे ः डॉ.तांबे रोटरी राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कारांचे वितरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कौशल्य निर्माण करणारे शिक्षण देण्याबरोबरच राष्ट्राच्या प्रती बांधिलकी जपणारे नागरिक निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

संगमनेर येथील रोटरी आय केअर हॉल येथे रोटरी राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश गाडे तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मंत्रालयातील नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, प्रकल्प प्रमुख नरेंद्र चांडक, सुनील घुले, सहाय्यक प्रांतपाल दिलीप मालपाणी उपस्थित होते. याप्रसंगी रोटरी राष्ट्रबांधणीचे शिल्पकार या पुरस्काराने गटशिक्षणाधिकारी कैलास पवार, मुख्याध्यापक शैलजा फटांगरे, शिक्षक पांडुरंग गोसावी, दत्तू आव्हाड, शायदा शेख, उमेश काळे, स्वाती भोर, संदीप पोखरकर, प्रीती खालकर, बाळासाहेब भागवत, योगिता वडनेरे यांना सन्मानित करण्यात आले. उत्तम प्रयोगशाळा व डिजिटल लॅब शाळांमध्ये उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. जगात शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग चालू आहेत. जगात फिनलँडची शिक्षण प्रणाली सर्वात आदर्श आहे असे आमदार डॉ.तांबे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. डॉ.प्रमोद राजूस्कर, महेश वाकचौरे, सुनील कडलग, रवींद्र पवार, ओंकार सोमाणी, पवनकुमार वर्मा, संजय कर्पे, ओंकार गंधे, रवींद्र ढेरंगे, ऋषीकेश मालानी, आनंद हासे, मधुसूदन करवा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.विनायक नागरे व डॉ.विकास करंजेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव ऋषीकेश मोंढे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *