हिरो कंपनीची ग्राहकांसाठी ‘पुन्हा’ योजना स्कूटर खरेदीवर तब्बल 4 हजार रुपयांची सूट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाहन उद्योगातील अग्रगण्य आणि नावलौकिकप्राप्त हिरो कंपनीने पुन्हा ग्राहकांसाठी खास योजना आणल्या आहेत. स्कूटर खरेदीवर तब्बल 4 हजार रुपयांची सूट असून 18 ते 24 ऑगस्ट पर्यंत ही योजना लागू असल्याची माहिती शहरातील ज्ञानमाता विद्यालयाजवळील ‘पद्मावती हिरो’ दालनाचे संचालक सुमित मणियार यांनी दिली आहे.

हिरो कंपनीने नुकताच दहावा वर्धापन दिन साजरा केला आहे. यानिमित्ताने ग्राहकांना आकर्षक योजना उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यानंतरही योजनांचा सिलसिला चालूच ठेवून स्कूटर खरेदीवर तब्बल 4 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. ही योजना 18 ते 24 ऑगस्ट पर्यंत चालू राहणार असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ उठवावा, असे आवाहन पद्मावती हिरोचे विक्री व्यवस्थापक संदीप अभंग यांसह व्यवस्थापनाने केले आहे.

Visits: 98 Today: 1 Total: 1103394

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *