संगमनेरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ट्रक रवाना
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘एक हात मदतीचा’ या अभियानांतर्गत युवक काँग्रेस, एनएसयूआय, अल्पसंख्यांक काँग्रेस सेल, अनुसूचित जाती-जमाती, जयहिंद युवा मंच यांनी कोल्हापूर व कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता मोठ्या प्रमाणात वस्तूरुपी मदत गोळा केली. हा मदत रथ नुकताच कोल्हापूरकडे रवाना करण्यात आला.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, निखील पापडेजा, गौरव डोंगरे, हैदर सय्यद, शेखर सोसे, जावेद तांबोळी, गौरव जाधव, सनी ठोंबरे, प्रथमेश मुळे, ऋत्विक राऊत, किशोर बोर्हाडे, हर्षवर्धन सातपुते, आकाश खाडे, सुमित पानसरे, कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, फरान बागवान, मनीष कागडे, सागर कानकाटे, दत्ता वाकचौरे, अलोक बर्डे, तौसिफ मणियार, मनषी राक्षे, अनिकेत आंबरे, श्रीनिवास कोकाटे, जयेश जोशी, नोमान इमानदार आदी उपस्थित होते. सदर मदतीमध्ये किराणा किट, कपडे, ब्लँकेट, सतरंजी, पाणी बॉक्स, बादल्या अशा एक ना अनेक वस्तूंचा समावेश आहे. हा वस्तूरुपी मदतीचा ट्रक कोल्हापूरकडे पाठविण्यात आला. प्रास्ताविक युवक शहराध्यक्ष निखील पापडेजा यांनी केले तर गौरव डोंगरे यांनी आभार मानले.