… अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लागू होणार ः तनपुरे
![]()
नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसर्या लाटेचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवरच पुन्हा निर्बंध कडक होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि आपत्ती निवारण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे.
![]()
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. दुसर्या लाटेतून जे अनुभव आले, ते लक्षात घेऊन सज्जता ठेवण्यात आली आहे. राज्यातील निर्बंध आता शिथील करण्यात आलेले आहेत. तरीही नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. राज्यात पुरेशा ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. केंद्राकडून जास्तीचा ऑक्सिजन मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्यावेळी राज्याची ऑक्सिजनची गरज 700 टनावर जाईल, त्या दिवसापासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत, असं मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास सर्वांच्या मदतीने या संकटावर मात करणे शक्य होणार आहे. सरकारी यंत्रणा सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असंही ते म्हणाले.
