निगडी चिखली मंडलच्या भाजप सरचिटणीसपदी तळपे

निगडी चिखली मंडलच्या भाजप सरचिटणीसपदी तळपे
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील बकुपिंपळगावचे भूमिपूत्र देवगड भक्त परीवारातील व पुणेरी नेवासकर ग्रुपचे सदस्य असलेल्या चेतन छबुराव तळपे यांची भाजपच्या निगडी चिखली पूर्णानगर मंडळच्या सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.


भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र दिले. शेतकरी कुटुंबात जन्मलेले चेतन तळपे हे सन 1993 साली कामानिमित्त बकुपिंपळगाव (ता.नेवासा) येथून पिंपरी चिंचवड कामगार नगरीमध्ये आले होते आणि तेव्हापासून समाजकार्याची आवड असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले होते. त्यांच्या निवडीबद्दल आमदार लक्ष्मण जगताप, नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नगर जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, पुणे येथील पुणेरी नेवासकर ग्रुपचे प्रमुख रवींद्र मुनोत, नगरसेवक राजू दुर्गे, महादेव कवितके, शांताराम भालेकर, किरण पाटील, शीतल वर्णेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 154 Today: 2 Total: 1423909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *