… अखेर भंडारदरा धरणाचे ‘आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे’ नामकरण

नायक वृत्तसेवा, राजूर
आदिवासी विकास परिषद व आदिवासी संघटनांनी एकत्र येत जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भंडारदरा धरण तथा विल्सन डॅमचे नाव बदलून ‘आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे’ असे नामकरण केले आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड आणि आदिवासी विकास परिषदेचे राज्याध्यक्ष तथा माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरा जलाशयावर हजारो तरुणांनी एकत्र येऊन भंडारदरा जलाशयावर जाऊन आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे असे नाव दिले. स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिल्याने आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे नाव भंडारदरा धरण तथा विल्सन डॅमला देणे ही खर्‍या अर्थाने समस्त आदिवासी तथा इतर सर्व समाजासाठी आनंदाची व अभिमानाची बाब असल्याचे माजी मंत्री पिचड यांनी नमूद केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे आदी उपस्थित होते.

Visits: 149 Today: 1 Total: 1104296

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *