संगमनेरात ऑगस्ट क्रांती व आदिवासी दिन साजरा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
1857 पासून सुरु झालेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यलढ्यातील सर्व राष्ट्रपुरुषांचे व स्वातंत्र्यसैनिकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अनमोल असून त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन तरुण पिढीने काम करावे, असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.

नगरपालिका, शहर काँग्रेस, जयहिंद युवा मंचच्यावतीने 9 ऑगस्ट क्रांती दिन प्रभात फेरी काढून साजरा करण्यात आला. याचबरोबर यशोधन कार्यालयात आदिवासी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे, काँगे्रसचे शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, गुलाब ढोले, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, निर्मला गुंजाळ, सौदामिनी कान्हेरे, अनुराधा आहेर, शालन गुंजाळ, नंदा बागुल, नगरसेवक नितीन अभंग, किशोर टोकसे, प्रा. एम. वाय. दिघे, जीवन पंचारिया, बाळू काळे, लाला दायमा, गणेश मादास, अरुण ताजणे, मुश्ताक शेख, गौरव डोंगरे, शेखर सोसे, राणीप्रसाद मुंदडा, उपसभापती नवनाथ अरगडे, तात्याराम कुटे, जालिंदर ढोकरट आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी नेहरू चौक येथील अशोक स्तंभास अभिवादन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिवासी सेवक बाळकृष्ण गांडाळ, पी. वाय. दिघे, नामदेव कहांडळ, संजय कोल्हे आदिंनी परिश्रम घेतले.

Visits: 196 Today: 1 Total: 2165228

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *