जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढलेल्या तालुक्यांना मिळाला आज दिलासा! ऑगस्टमधील निचांकी रुग्णसंख्या; संगमनेर तालुक्यातील आणखी एका रुग्णाचा बळी.
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या एकूण सरासरीसह संगमनेर तालुक्याच्या दैनिक सरासरीत मोठी भर घातल्यानंतर आज संगमनेरसह पारनेर, श्रीगोंदा, अकोले, राहुरी व श्रीरामपूर तालुक्यांना काहीसा दिलासा मिळाला असून रुग्णसंख्येत मोठी घट नोंदविली गेली आहे. संगमनेर तालुक्यातील पठारभागात वाढलेला संक्रमणाचा टक्काही आज खाली आला असून पठारावरील चौदा गावांमधून आज 25 रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळणार्या साकुरमध्ये आज केवळ एक रुग्ण आढळला आहे. संगमनेर शहरातील रुग्णसंख्येतही आज मोठी घसरण झाली असून अवघ्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता25 हजार 457 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील 18 रुग्णांचा कोविडने बळी घेतला असून त्यात संगमनेर तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
गेल्या 28 जुलैपासून संगमनेर तालुक्याच्या पठारभागातून मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवू लागले आणि बघताबघता आठच दिवसांत साकूरसह आसपासच्या गावांत कोविड संक्रमणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने जिल्हा परिषदेच्या साकूर गटासह आश्वी गटातही कडकडीत ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी करण्याची वेळ आली. या कालावधीत प्रशासनाकडून घरोघरी जावून आरोग्य तपासणी करण्याची करण्याचर मोहीमही राबविली गेल्याचे बोलले जाते. त्यातून रुग्णसंख्या वाढत जावून आजच्या स्थितीत ती खालावू लागल्याने काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. आजच्या अहवालातून कोविड संक्रमणाला पुन्हा जोर चढलेल्या संगमनेरसह पारनेर, श्रीगोंदा, अकोले, राहुरी व श्रीरामपूर या तालुक्यातील रुग्णसंख्या कमालीची घटली असून आज केवळ ईमदनगर ग्रामीण व पाथर्डी तालुक्यात कालच्या तुलनेत अधिक रुग्ण आढळले आहेत.
आज शासकीय प्रयोगशाळेचे 13, खासगी प्रयोगशाहेचे 25 व रॅपीड अँटीजनेच्या चाचणीतून 37 अशा एकूण 74 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात संगमनेर शहरातील जनता नगरमधील 22 वर्षीय तरुण व साईनगर परिसरातील 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजच्या अहवालातून पठारभागातील संक्रमणातही मोठी घट झल्याचे दिसून आले असून केवळ चौदा गावातील 25 जणांना कोविडची लागण झाली आहे. त्यात साकूर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह अकलापूर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 42 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी, घारगाव येथील 37 व 30 वर्षीय महिलांसह बारा वर्षीय जुळी भावंडे, कोठे बु. येथील 49 वर्षीय इसम, जांबुत खुर्द येथील 42 वर्षीय तरुण,
बिरेवाडीतील 55 वर्षीय महिला, मांडवे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 36 वर्षीय तरुण, खांबे येथील 48 वर्षीय इसम, कुंभारवाडीतील 85 व 45 वर्षीय महिलांसह 55 वर्षीय इसम व 37 वर्षीय तरुण, हिवरगाव पठारावरील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वरवंडी येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय महिला, खंदरमाळ येथील 41 वर्षीय दोघा तरुणांसह 16 वर्षीय मुलगी, पिंपळदरी येथील 60 वर्षीय महिला व जांबुत बु. येथील 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तालुक्यातील अन्य 21 गावांमधूनही आज 47 रुग्ण समोर आले असून त्यात गुंजाळवाडी येथील 39 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 52 वर्षीय इसम, कोल्हेवाडीतील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42 वर्षीय महिला, 24 व 22 वर्षीय तरुण,
सावरगाव तळ येथील 22 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगा, वेल्हाळे येथील 62 वर्षीय महिलेसह 23 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, आश्वी बु. येथील 41 वर्षीय महिला, धांदरफळ बु. येथील 31 वर्षीय तरुण, मालदाड येथील 65 वर्षीय महिला, वाघापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचपूर येथील 65 व 44 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 व 30 वर्षीय महिला, 35 वर्षीय तरुण, कणकापूर येथील 31 व 28 वर्षीय तरुणांसह 25 वर्षीय महिला, शिबलापूर येथील 20 वर्षीय तरुणी, आश्वी खुर्द येथील 43 व 34 वर्षीय तरुणांसह 43 वर्षीय महिला,
खळी येथील 43 व 42 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 31 वर्षीय तरुण, डिग्रस येथील 55 वर्षीय इसमासह 37 वर्षीय तरुण, शेडगाव येथील 32 वर्षीय दोघा तरुणांसह 15 व 11 वर्षीय मुली, आठ व सहा वर्षीय मुले, पिंपरी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 व 35 वर्षीय महिला, 37 व 21 वर्षीय तरुण व 12 वर्षीय मुलगी आणि पानोडी येथील 51 वर्षीय इसमासचा समावेश आहे. यासोबतच गेल्या चोवीस तासांत तालुक्यातील एका रुग्णाचा कोविडने बळी घेतला असून आता मृत्यू झालेल्या तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 407 झाली आहे, मागील 24 तासांत जिल्ह्यातील 18 जणांचे जीव गेले आहेत. तालुक्यातील सक्रीय संक्रमितांची संख्याही गुरुवारी कमी झाल्यानंतर आजही त्यात घट होवून नऊशेच्या आसपास स्थिरावली आहे. आज वाढलेल्या रुग्णसंख्येने तालुका आता 25 हजार 457 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
तालुक्यासह आज पाथर्डी व अहमदनगर ग्रामीण वगळता उर्वरीत संपूर्ण जिल्ह्यालाही काहीसा दिलासा मिळाला असून 1 ऑगस्टनंतर आज पहिल्यांदाच निचांकी रुग्णसंख्या समोर आली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 98, खासगी प्रयोगशाळेचे 302 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या 306 अहवालातून जिल्ह्यातील 706 जणांना कोविडची लागण झाली असून आज सर्वाधीक 75 रुग्ण पारनेर तालुक्यातून समोर आले आहेत. त्या खालोखाल संगमनेर 74, नगर ग्रामीण व शेवगाव प्रत्येकी 73, पाथर्डी 48, नेवासा 47, कर्जत 46, राहुरी 44, जामखेड 42, अहमदनगर महापालिका क्षेत्र व राहाता प्रत्येकी 31, श्रीगोंदा 30, अकोले 29, श्रीरामपूर 27, कोपरगाव 23, इतर जिल्ह्यातील अकरा व भिंगार लष्करी परिसरातील दोघांचा समावशे आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 4 हाजर 179 झाली आहे.