अधिकारी व ठेकेदाराच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ


नायक वृत्तसेवा, राहुरी
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांधकाम शाखेमध्ये असलेल्या एका अभियंत्याच्या व राहुरीतील एका विद्युत ठेकेदार यांच्या सोबत झालेली संभाषणाची ऑडिओ क्लिप विद्यापीठ वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यातील संभाषणामुळे अधिकारी व ठेकेदार कोण ही चर्चा रंगली आहे.

या क्लिपमधील अभियंता ठेकेदारास पन्नास हजार रुपयाची मागणी करताना दिसून येत आहे. तसेच यापूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांची चर्चा करतानाचा संवाद ऐकू येत आहे. हे पन्नास हजार हळूहळू येणार्‍या फाईलमध्ये ऍडजस्ट करू असेही यात उल्लेख आहे. या क्लिपमुळे विद्यापीठ अभियंता कार्यालयात सुरू असलेला काळाबाजार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. आता या क्लिपचे पुढे काय होणार? विद्यापीठाचे विद्यापीठ अभियंता, कुलसचिव व कुलगुरू यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visits: 173 Today: 2 Total: 2350363

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *