आंबीच्या ग्रामसभेत वाळू लिलावास जोरदार विरोध कोरोना महामारीमध्ये ग्रामसभेला परवानगी कशी मिळते ः अॅड. कोळसे
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील महसूल विभागाने आंबी येथे वाळू लिलावाबाबत ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेत प्रवरा नदीपात्रातील येथील वाळू लिलावास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. महिला सरपंच संगीता बाळासाहेब साळुंके ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महसूल विभागाचे ताहराबाद मंडलाधिकारी एस. एस. हुडे, कामगार तलाठी चितळकर, ग्रामसेवक अभिजीत पिंपळे यांनी सभेचे कामकाज पाहिले.
शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोरोना महामारीचे कारण देत प्रशासन ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेण्यास परवानगी देत नाही, मग वाळू उपशाच्या लिलावासाठी ग्रामसभेला परवानगी कशी मिळते असा सवाल अॅड. सागर कोळसे यांनी व्यक्त केला. यापुढे नदीपात्रातील वाळूचा एक खडाही उचलू देणार नाही, वाळू लिलावास ग्रामसभेला कायम विरोध राहील असे शिवाजी कोळसे, रावसाहेब सालबंदे, भागवत कोळसे, उपसरपंच विजय डुकरे, अशोक कोळसे, संजय फुलमाळी यांनी सांगितले.
या ग्रामसभेस डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळकृष्ण कोळसे, हरिश्चंद्र साळुंके, सर्जेराव डुकरे, दत्तात्रय कोळसे, नंदू कोळसे, संजय फुलमाळी, अॅड. विठ्ठल कोबरणे, केशव साळुंके, कृष्णा मगर, नितीन कोळसे, चांगदेव रोडे, अशोक साळुंके, अच्युत जाधव, अफजल इनामदार, चंद्रकांत पाटील, नवनाथ कोळसे, मच्छिंद्र डुकरे, भास्कर कोळसे, गणेश कोळसे, भीम कोळसे, जालिंदर रोडे, बाळासाहेब साळुंके, प्रभाकर सालबंदे, सुभाष डुकरे, दत्तात्रय हुरुळे, गोविंद डुकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.