पठारासह संगमनेर तालुक्याच्या संक्रमणात झाली मोठी वाढ! तालुक्याने ओलांडला 25 हजारांचा टप्पा; अवघ्या तीन दिवसांतच चारशेहून अधिक रुग्ण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरसह शेवगाव व पारनेर तालुक्यात चढाला लागलेला संक्रमणाचा वेग दिवसोंदिवस अधिक गडद होत असून एकट्या संगमनेर तालुक्यातच गेल्या तीन दिवसांत सरासरी 134 च्या गतीने तब्बल 402 रुग्णांची भर पडली आहे. संक्रमणाचा वेग अधिक गतिमान होत आज तालुक्यातील 64 गावे व वाड्यावस्त्यांमधून 148 रुग्ण समोर आले असून त्यात पठारभागातील 22 गावे आणि वाडीवस्त्यांवरील 58 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालातून शहरी रुग्णसंख्येत मात्र मोठी घसरण दिसून आली असून केवळ चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 25 हजारांचा टप्पा ओलांडून 25 हजार 113 झाली असून सक्रीय रुग्णांची संख्याही अकराशेच्या पार गेली आहे.
शासन व प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही काही नागरिकांचा हलगर्जीपणा वाढलेल्या संक्रमणाला कारणीभूत असून इतका मोठा फटका बसल्यानंतरही पुन्हा पुन्हा त्याच त्या चूका केल्या जात असल्याने तालुका तिसर्या संक्रमणाच्या दिशेने वेगात प्रवास करु लागला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात तालुक्यात सरासरीत मोठी घट होवून संक्रमण नियंत्रणात येत असल्याचे चित्र निर्माण होवू लागले होते. मात्र याच दरम्यान पठारभागात प्रशासनाच्या दुर्लक्षातून शेकडोंच्या उपस्थितीत धुमधडाक्यात विवाह सोहळे साजरे झाल्याने त्याचे दुष्परिणाम साकूर व आश्वी गटाला पुन्हा एकदा कडकडीत ‘टाळेबंदी’चा सामना करण्याची वेळ आली आहे. मुठभर लोकांचा हा हलगर्जीपणा आज संपूर्ण तालुक्यातील नागरिकांच्या जीवावर उठला असून जुलैतील सरासरी 32 रुग्णांचा प्रतिदिवसाचा वेग ऑगस्टच्या पहिल्या तीन दिवसांतच थेट 134 रुग्ण दररोज या गतीवर गेला आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे आठ, खासगी प्रयोगशाळेचे 90 व रॅपीड अँटीजेनच्या चाचणीद्वारा समोर आलेल्या 50 निष्कर्षातून जिल्ह्यात सर्वाधीक 148 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात वडगाव लांडगा येथील 50 वर्षीय इसमाचा अहवाल दुबार आला असून अन्य तालुक्यातील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. आजच्या एकूण अहवालात तालुक्याच्या पठारभागातील 22 गावे व वाड्यावस्त्यांमधून 58 जणांसह अन्य 42 गावे व वाड्या मिळून एकूण 142 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या अहवालात संगमनेर शहरातील अवघ्या चौघांचा समावेश असून त्यात अकोले नाका येथील 46 वर्षीय महिला, घोडेकर मळ्यातील 47 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 19 वर्षीय तरुणासह 12 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
पठारभागातील साकूर जिल्हा परिषदेच्या वीस गावांमध्ये गेल्या शनिवारपासून कडकडीत लॉकडाऊन सुरु आहे. असे असतांनाही पठारभागातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चिंताजनक चित्र गेल्या तीन दिवसांपासून समोर येत असून आजही साकूर आणि परिसरातील अनेक वाड्या व वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. अर्थात लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने यासर्व गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम हाती घेवून घरोघरी तपासणी सुरु केल्याचाही हा परिणाम आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये नांदूर खंदरमाळ येथील 51 वर्षीय इसमासह 40, 38, 34, 30 व 26 वर्षीय तरुण, 45 व 35 वर्षीय महिलांसह 19 वर्षीय तरुणी, माळवाडी येथील 34 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय मुलगी व बारा वर्षीय मुलगा, बोटा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 33 व 24 वर्षीय महिला,
देवीपठार (साकूर) येथील 38 वर्षीय महिला, साकूर मधील 75 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षीय इसम, 35 वर्षीय तरुण, 80 व 65 वर्षीय दोघी, 31, 27, 25 व 24 वर्षीय महिला, 21 वर्षीय दोन तरुणींसह पाच वर्षीय बालिका, कोठे येथील 44 वर्षीय महिला, म्हसवंडी येथील 38 वर्षीय तरुण, बोरबन येथील 38 वर्षीय तरुण, डोळासणे येथील 31 वर्षीय महिला, शिंदोडी येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 31 वर्षीय तरुण, मांडवे येथील 65 व 32 वर्षीय महिलांसह 19 वर्षीय तरुण, जांभुळवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 व 18 वर्षीय तरुण, जांबूत खुर्द येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपळगाव देपा येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, पिंपळगाव माथा येथील 65 वर्षीय महिला, वरुडी पठार येथील 26 वर्षीय तरुण, कुंभारवाडीतील 78 वर्षीय ज्येष्ठासह 72 वर्षीय महिला, चिंचेवाडीतील 60 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, हिरेवाडीतील 24 वर्षीय तरुण, जांबूत बु. येथील 27 व 18 वर्षीय तरुण, घारगाव येथील 50 वर्षीय इसम व खांडगेदरा येथील 55 वर्षीय इसमासह 22 वर्षीय तरुण.
तालुक्यातील अन्य 42 गावांतील पेमगिरीतील 37 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 30 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 56 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 57 व 43 वर्षीय इसमासह 23 वर्षीय महिला, आश्वी बु. येथील 26 वर्षीय तरुण, आश्वी खुर्द येथील 50 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगी, डिग्रस येथील 13 वर्षीय मुलगा, पानोडी येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शेडगाव येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40, 38 व 34 वर्षीय तरुण, 35 वर्षीय दोघी, 30 व 25 वर्षीय महिला आणि 14 वर्षीय दोन मुले, रायतेवाडीतील 28 वर्षीय तरुण, राजापूर येथील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 17 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 57 वर्षीय इसम, वाघापूर येथील 21 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 47 वर्षीय इसमासह 44 वर्षीय महिला, कनोली येथील 47 वर्षीय इसम, अंभोरे येथील 30 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 69 व 50 वर्षीय महिला, जोर्वे येथील 21 वर्षीय तरुण, कोकणेवाडीतील 40 वर्षीय तरुण,
निमगाव भोजापूर येथील 46 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 74 वर्षीय ज्येष्ठासह 51 वर्षीय महिला, कौठे कमळेश्वर येथील 54 वर्षीय महिला, पिंप्रीलौकी येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पोखरी हवेली येथील 65 वर्षीय महिला, निळवंडे येथील 35 वर्षीय महिला, मालदाड येथील 22 वर्षीय तरुण, कासारे येथील 45 वर्षीय इसमासह 36 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 42, 22 व 19 वर्षीय तरुणांसह 37 व 36 वर्षीय महिला, लोहारे येथील नऊ वर्षीय बालिका, कासारा दुमाला येथील 85 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 31 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील 44 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, 35, 32 व 25 वर्षीय तरुण, 16 वर्षीय मुलगा व चौदा वर्षीय मुलगी, चंदनापूरी येथील 50 वर्षीय इसम, 27 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुण, निमज येथील 39 वर्षीय महिला, रायते येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,
खांडगाव येथील 56 वर्षीय इसमासह 30 वर्षीय तरुण, झोळे येथील 28 व 20 वर्षीय तरुण, वडझरी बु. येथील 51 वर्षीय इसम, वडगाव लांडगा येथील 50 वर्षीय इसम, सावरगाव तळ येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 18 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 70 40 व 26 वर्षीय महिलांसह 41, 38, 28 व 18 वर्षीय तरुण आणि तीन वर्षीय बालिका, कौठे धांदरफळ येथील 43 व 30 वर्षीय महिलांसह 37 वर्षीय तरुण व जवळे कडलग येथील 30 वर्षीय महिला. तसेच वडगाव लांडगा येथील 50 वर्षीय इसमाचे नाव दुबार नोंदविले गेले असून अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील 33 वर्षीय तरुणाचा अहवालही संगमनेरच्या नावात गृहीत धरल्याने आज तालुक्यातून एकूण 146 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आता अकराशेच्या पुढे गेली असून एकूण रुग्णसंख्येने 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.