… तर सर्व वकिलांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन द्या ः अॅड.गोडसे
… तर सर्व वकिलांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन द्या ः अॅड.गोडसे
नायक वृत्तसेवा, अकोले
मार्च 2020 पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे वकिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे न्यायालय सुरळीतपणे सुरू करावे अथवा बंद ठेवायचे असेल तर सर्व वकिलांना प्रत्येकी दरमहा 15 हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी अकोले तालुका वकील संघाच्यावतीने करण्यात आल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष अॅड.भाऊसाहेब गोडसे यांनी दिली.
राज्यात इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर, महाराष्ट्र यांच्यावतीने सुरक्षित अंतर पाळून वकिलांनी आंदोलने केल्याची माहिती अॅड.गोडसे यांनी दिली. तर या मागणीचे निवेदन अकोले दिवाणी व फौजदारी न्यायाधीश क-स्तर, तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोडसे, शांताराम वाळुंज, वसंत मनकर, बी.व्ही.मनकर, आर.डी.नवले, एस.पी.जाधव, एस.बी.वाकचौरे, आर.के.जोरवर, एम.के.हांडे, पी.टी.नवले, बी.एम.नवले, एस.डी.पोखरकर, सय्यद बिलाल, नवाज खतीब, चंद्रकांत सुपे आदी सदस्य उपस्थित होते.